Pune Bribe News  Sarkarnama
पुणे

Pune Bribe News : पुण्यात चाललंय काय? पंधरा दिवसातच दुसरा लाचखोर वकील पकडला!

Pune ACB Trap News : गायकवाडनंतर राहूल फुलसुंदर हा दुसरा वकिल पुण्यात पीएसआय चव्हाणसह लाचखोरीत 15 दिवसांतच पकडला

Uttam Kute

Pune News : एसीबीने आपल्या कारवाईचा रोख पुन्हा एकदा पुणे शहराकडे वळवला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी त्यांनी दोन, तर या महिन्यात आतापर्यंत लाचेचे दोन ट्र्रॅप केले. त्यात काल (ता. 22) रात्रीच्या ताज्या घटनेत अलंकार पोलिस ठाण्यातील पीएसआय गणेश वसंत चव्हाण (वय 35 वर्षे रा. सर्वे न 21/44 ,परमार नगर शासकीय पोलिस कॉटर, वानवडी ,पुणे) आणि अॅड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय 31,रा. फ्लॅट 204 ,चित्रदुर्ग अपार्टमेंट ,कोथरुड, पुणे) या दोघांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. (Latest Marathi News)

15 दिवसांपूर्वीच 9 तारखेला पाच लाख रुपयांची लाच मागून, त्यातील पावणे दोन लाख रुपये एका 25 वर्षीय तरुणीकडून घेणारा, तेवढ्याच वयाचा तरुण वकील सुमीत गायकवाड (वय 25) याला पकडण्यात आले होते. त्यातील काही रक्कम त्याने 'फोन पे' व्दारेही घेतली होती. त्यानंतर शिवाजीनगर, पुणे कोर्टातील अॅड. फुलसुंदर हा काल चाळीस हजार रुपयांची लाच पीएसआय चव्हाणसाठी घेताना पकडला गेला. नंतर चव्हाणचीही धरपकड करण्यात आली.

दोन्ही वकील आरोपी असलेल्या या दोन्ही गुन्ह्यांत कमालीचे साम्य आहे. पोलिसांना सांगून कारवाई टाळण्यासाठी या वकिलांनी ही लाच घेतली आहे. त्यात पहिल्या प्रकारात पोलिसांचा रोल न आढळल्याने त्यांना आरोपी केले गेले नाही. मात्र, काल त्यांचा सहभाग दिसून आल्याने पीएसआय चव्हाणला त्यात आरोपी करून अटकही करण्यात आली आहे. दोन्ही घटनांत पाच लाख रुपयांची लाच मागितली गेली होती. दोन्ही घटनांतील तक्रारदार तरुण वर्ग आहे. वकील आणि पोलिस अशा या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर, पुणे येथील विशेष न्यायालयात दुपारी हजर केले जाणार आहे.

कालच्या घटनेत पाच लाख रुपयांची लाच मागून नंतर चाळीस हजारावर तडजोड झाली होती. त्यातील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध अलंकार पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात पीएसआय चव्हाणने अटक न करून तपासात मदत करण्याकरिता ही लाच मागितली होती. ती लाच घेताना काल एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे आणि तावरे, डावखरे, कदम या पथकाने अॅड. फुलसुंदरला पकडले. या दोघांविरुद्ध अलंकार पोलिस स्टेशन येथे काल रात्री उशीरा लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT