ShivSena MLA Disqualification : राहुल नार्वेकरांच्याविरोधात आंदोलन ठाकरे गटाला भोवले, पोलिसांकडून 10 जणांना अटक

Devendra Godbole : ठिकठिकाणी आंदोलन करीत नार्वेकरांचा निषेध नोंदवला जात आहे. असाच निषेध नोंदवणाऱ्या ठाकरे गटाच्या नागपूर जिल्हाध्यक्षांना चांगलेच महागात पडले.
Shiv Sena andolan
Shiv Sena andolansarkarnama
Published on
Updated on

Nagpur : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी नुकताच निकाल दिला. या निकालाने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. उद्धव ठाकरे या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले आहेत. मात्र, ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करीत नार्वेकरांचा निषेध नोंदवत आहेत. असाच निषेध नोंदवणाऱ्या ठाकरे गटाच्या नागपूर जिल्हाध्यक्षांना चांगलेच महागात पडले.

Shiv Sena andolan
PM Modi in Nashik : केंद्रीयमंत्री चमकले, राज्याचे मंत्री झाकोळले

नार्वेकरांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या नागपुरातील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गोडबोले नार्वेकर यांच्याविरोधात दोन दिवस आंदोलन करीत होते. आंदोलन करताना त्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. तसेच मुंडण आंदोलनही केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलन करताना पोलिसांनी गोडबोले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोडबोले यांनी पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला. त्यांनी काढलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेतदेखील बराच गोंधळ झाला. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून पोलिसांनी गोडबोले यांच्यासह 10 कार्यकर्त्यांना अटक केली होती.

ठाकरे गटाकडून नार्वेकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट राहुल नार्वेकरांवर आरोप केला आहे, की त्यांनी ज्याआधारे निकाल दिला तो आधारच मुळात चुकीचा आहे. कारण शिवसेनेच्या घटनेमध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून नोंद केल्यानंतर त्याची प्रत निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. त्याची पोहोचदेखील आमच्याकडे आहे.

(Edited By Roshan More)

R...

Shiv Sena andolan
Mahayuti Melave : महायुतीचे महामेळावे होणार दणकेबाज; 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com