Chandni Chowk Inauguration  Sarkarnama
पुणे

Chandni Chowk Inauguration : गडकरींच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी, मात्र मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीने रंगली `कोल्ड वॉर`ची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकार क्षेत्रातील समितीचा आढावा घेतल्याने या दोन नेत्यांत `कोल्ड वॉर`रंगल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही केल्याने त्यात आणखी भर पडली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकातील आजच्या उद्धघाटनाला दोन्ही उपमुख्यमंत्री (पवार आणि देवेंद्र फडणवीस) प्रत्यक्ष उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र, प्रत्यक्ष उपस्थिती टाळल्याने या चर्चेने आता मूळ धरले आहे.

अर्थमंत्री या नात्याने सदर समितीची आढावा बैठक घेतल्याचा खुलासा अजित पवारांनी केला.तरीही त्यांच्यातील व शिंदेंमधील शीतयुद्धाची चर्चा थांबलेली नाही. १५ ऑगस्टला कुणा मंत्र्यांने कुठल्या जिल्ह्यात झेंडावंदन करायचे यावरून अगोदरच शिंदे-पवार-फडणवीसांच्या मंत्र्यांत कुरबुर झाली होती. ती त्यात बदल केल्यानंतर थोडी कमी झाली होती.त्यानंतर हे कोल्ड वॉर सुरु झाल्याने महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सव्वा महिन्यातच समोर आले आहे.

प्रकृती बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमाला येणार नाहीत. ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.तर, या उदघाटनाला अजित पवार हे मेट्रोने आले. त्यांनी रुबी हॉल ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतून येताना नागरिकांशी संवाद साधला.

चांदणी चौकाला एनडीए ब्रिज नाव द्यावे, अशी मागणी चेंज इंडिया फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. बदनाम चांदणी म्हणण्याऐवजी एनडीए ब्रिज म्हणा,असं फाऊंडेशनचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी दारूच्या,बिअरच्या बॉटल लटकावून प्रतिकात्मक सह्यांची मोहिम घेतली.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT