Interim Relief To Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांना मुंबई सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा..

Mumbai Sessions Court Order : बॉडी बॅग खरेदीत ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama

Mumbai : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. २८ ऑगस्टपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. कोरोना काळातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. अर्जावर पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. याप्रकरणी एकूण चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Kishori Pednekar
Ajit pawar On Vijay Wadettiwar : अर्थमंत्री म्हणून मी बैठक घेतली, ओरड कशाला करतात? अजितदादांनी वडेट्टीवारांना फटकारले..

कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट रोजी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बॉडी बॅग खरेदीत ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या या गुन्ह्यासंबंधीची माहिती ईडीने मागवली आहे.

Kishori Pednekar
Eknath Khadse on Nawab Malik : एकनाथ खडसेंचे मलिकांबाबत मोठे विधान ; "मलिकांना भाजपची ऑफर.."

ईडीने किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी मागवली आहे. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे मुंबई पोलिसांकडून ईडीने मागवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात मुंबईतल्या आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता ईडी देखील त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com