Police investigate the Chandannagar murder case in Pune after a young woman died following a knife attack linked to a love affair dispute. Sarkarnama
पुणे

Pune Crime News : पुणे हादरलं! प्रियकराकडून 22 वर्षीय तरूणीची थेट घरात घुसून हत्या

Chandannagar Murder Case : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रियकराने थेट प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं आता उघडकीस आलं आहे.

Jagdish Patil

Pune Crime News, 08 May : मागील अनेक दिवसांपासून पुण्यात लहान मुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर येत आहे. वाढलेल्या अत्याच्याराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच पुण्यातील चंदननगर परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्रियकराने थेट प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं आता उघडकीस आलं असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि मयत तरूणी उजालादेवी दोहरे (२२) हे दोघेही पुण्यातील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. याच मॉलमध्ये त्यांची ओळख झाली होती. काही दिवसांतच या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

मात्र काही दिवसांपूर्वी उजालादेवी तिच्या मूळ गावी गेली असता तिच्या तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं. तरुणीने आपल्या लग्नाची ठरल्याची माहिती दिलीप याला दिल्यानंतर तो संतापला. त्याला हे लग्न मान्य नव्हतं. याच रागातून आरोपी दिलीप हा २९ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास थेट तरुणीच्या चंदननगर येथील घरात घुसला.

घरात दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात दिलीपने तरुणीच्या गळ्यावर आणि शरीरावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात उजालादेवी गंभीर जखमी झाली होती. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. मागील काही दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आता तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या हत्ये प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी दिलीप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT