Pune City Hording Sarkarnama
पुणे

Pune City Hording News : शहरातील 5 हजार होर्डिंगचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर !

Pune Municipal Administration : महापालिका प्रशासनाने केलेल्या एका पाहणीमध्ये, 2 हजार 629 होर्डिंग अनधिकृत असल्याची उघड झाले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ..

Sudesh Mitkar

Pune News : मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने सर्व होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात तब्बल 2 हजार 500 अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले असल्याची त्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर पालिकेचा अधिकृत परवाना घेऊन तितकेच होर्डिंग उभारण्यात आले आहे. या तब्बल 5 हजार होर्डिंगच्या स्ट्रक्चरच्या सुरक्षितते बाबत महापालिका देखील शाशंक आहे. त्यामुळे पालिकेने होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाळ्यामध्ये असे होर्डिंग कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या होर्डिंगचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर बसले असणार आहे.

सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा पावसामध्ये मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग पडल्यामुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर तब्बल 75 जण यामध्ये जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेला देखील जाग आली असून शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या (PMC) आकाशचिन्ह विभागाकडून शहरामध्ये होर्डिंगला परवानगी देण्यात येते. यासाठी शुल्क आकारणी करण्यात येत असते. शुल्क वाढीवरुन कायमच महापालिका आणि होर्डिंग मालक यांच्यामध्ये वाद आहे. त्यामुळे शुल्क भरण्यापासुन वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिका प्रशासनाने केलेल्या एका पाहणीमध्ये, 2 हजार 629 होर्डिंग अनधिकृत असल्याची उघड झाले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगस वर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबई (Mumbai) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिका आयुक्तांनी शहरतील सगळया होर्डिंगस ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच अनधिकृत असलेल्या होल्डिंगचे लायसन रद्द करण्याची देखील प्रक्रिया करण्याच्या सूचना प्रशासनाला दिले आहेत. आता पर्यंत 2300 होर्डिंगस च ऑडिट झालं असून एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगस वर पुणे महानगरपालिकेची कारवाई करण्यात आली आहे. माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.

तूर्तास पाणी कपात नाही

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये अत्यंत अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे . लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच पाणी कपात सुरू होईल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. तूर्तास तरी पाणी कपात करण्यात येणार नाही असं महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितला आहे. शहर परिसरामध्ये पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती देखील आयुक्तांना दिली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT