Murlidhar Mohol- Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule On Murlidhar Mohol : पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा ठेकेदारांना होऊ नये, खासदार सुळेंचा टोला !

Pune Lok Sabha Election 2024 : 'पन्नास खोके, एकदम ओके' हे सरकारला लागू पडत असेल पण, मायबाप जनतेला लागू पडत नाही, हे मतदारांनी दाखवून दिले. संविधानानेच देश चालेल हे देशातील जनतेने सांगितले.

Chaitanya Machale

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा पुणेकरांना व्हावा, ठेकेदारांना होऊ नये, असा खोचक टोला खासदार सुळे यांनी नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नाव न घेता लगावला.

पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांना लक्ष्य केले आहे.हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. मंत्रिपद मिळाले आहे आता पुण्याला. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग काँन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला हाणला आहे. 'पन्नास खोके इज नॉट ओके' असे म्हणत सुळे यांनी विरोधकांना सुनावले आहे. मायबाप जनतेने जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका मतामध्ये काय ताकद असते हे जनतेने सिद्ध करून दाखविले आहे. तुम्ही धनशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले आहे. पन्नास खोके, एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू पडत नाही, हे दाखवून दिले.संविधानानेच देश चालेल हे देशातील जनतेने दाखवून दिले.

पुणे दौऱ्यावरती असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, धंगेकर ॲाक्टोबरमध्ये पुन्हा आमदार होतील, असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला. आमदार धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मृतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.आजच मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पाणी तुंबतय, ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज येत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करणे आवश्यक आहे, असेही सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT