Supriya Sule On Ravindra Dhangekar : खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, रवींद्र धंगेकर 'कमबॅक' असे करतील की...'

MP Supriya Sule, Ravindra Dhangekar and Muralidhar Mohol Pune Politics : महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी देखील मोठी ताकद रवींद्र धंगेकर यांच्या मागे उभी केली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारा सामना हा शेवटी शेवटी अटीतटीत सुटणार, असे चित्र निर्माण झाले होते.
Supriya Sule, Ravindra Dhangekar and Muralidhar Mohol
Supriya Sule, Ravindra Dhangekar and Muralidhar Mohol sarkarnama

Pune News : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला चारी मुंड्या चित करून आसमान दाखवणाऱ्या काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत मात्र दारुण पराभव झाला. रवींद्र धंगेकर यांचा हा पराभव महाविकास आघाडीसाठी धक्कादायक मानला जात आहे. मात्र रवींद्र धंगेकर पुन्हा कमबॅक करतील आणि ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा कसब्यातून आमदार होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पुण्यातून तब्बल एक लाख वीस हजार मतांनी पराभव झाला. भाजपचा (BJP) गड मानला जाणाऱ्या कसबा विधानसभा पोट निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवल्यानंतर ते राज्यभरात प्रसिद्ध झोतात आले. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीने त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं.

रवींद्र धंगेकर यांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने (Congress) राज्य पातळीवरच्या तसेच केंद्रीय पातळीच्या नेत्यांना देखील पुण्यात उतरवलं. महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी देखील मोठी ताकद रवींद्र धंगेकर यांच्या मागे उभी केली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारा सामना हा शेवटी शेवटी अटीतटीत सुटणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र निकालानंतर हा सामना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहजरित्या आपल्या खिशात टाकल्याचं समोर आलं.

या पराभवामध्ये रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का हा ते आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून मिळाला. ज्या विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांनी 12 हजाराचे मताधिक्य घेत विजय साकार केला होता. त्याच मतदारसंघातून रवींद्र धंगेकर तब्बल 15 हजाराच्या मताधिक्याने पिछाडीवरती पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या कासब्या बाबतच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून कसब्याचा गड पुन्हा मिळवणार, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र तसं वाटत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे दौऱ्यावरती असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, संविधानानेच देश चालेल हे देशातील जनतेनं दाखवून दिले. 'पन्नास खोके इज नॅाट ओके', हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली आहे. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रिपद मिळाले त्यात माला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा, ही अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Supriya Sule, Ravindra Dhangekar and Muralidhar Mohol
Sharad Pawar : लोकसभा निकाल इम्पॅक्ट; शरद पवारांकडे 'इन्कमिंग', अजितदादांपाठोपाठ भाजपला 'दे धक्का'

लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला असला तरी, धंगेकर ॲाक्टोबरमध्ये पुन्हा आमदार होतील. धंगेकर यांनी 'ड्रंक ॲन्ड ड्राईव', केस मधील मृतांना न्याय मिळवून देण्याचं काम केले आहे. पुण्यात प्रशासनच नाही. आज मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पाणी तुंबतय, ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज येत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule, Ravindra Dhangekar and Muralidhar Mohol
Murlidhar Mohol : संपर्क असेल तर देव पण दिसेल; अण्णांनी दाखवून दिले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com