Pune News  Bhagatsingh Koshyari
Pune News Bhagatsingh Koshyari Sarkarnama
पुणे

Pune closed : उद्या पुणे बंद : साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

Umesh Vishnu Ghongade

Pune closed News : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंगळवारी विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक दिली आहे. भाजपा, मनसे व शिवसेनेचा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वगळता राज्यातील सर्व पक्षांचा या बंदला पाठिंबा आहे. पुणे बंद ठेऊन पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केले.( Pune closed News)

यादरम्यान शहरात कोणत्याही स्वरुपाची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विविध राजकीय पक्ष संघटना, पक्षांकडून पुकारलेल्या या बंदमध्ये अनेक सामाजिक, स्वयंसेवी संघटनाही सहभागी होणार आहे. उद्या सकाळी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार असल्याने पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.

शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्चाच्यावेळी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे या मोर्चावर लक्ष आहे. याबरोबरच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याचीही पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. मोर्चाच्या मार्गावर तसेच अनुचित प्रकार घडू शकतो, अशा काही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.

शिवसेनेकडून सुरवातीला राज्यव्यापी बंदची योजना करण्यात आली होती. मात्र, बंद ठेवण्यास महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी सहमती दर्शविली नाही. त्यावर दुसरा मार्ग म्हणून आघाडीच्यावतीने 17 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.या मोर्चाची महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे.कोश्‍यारी यांचे वक्तव्य तसेच राज्य सरकारचा एकुणच कारभाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT