Pune News: श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर उन्हात सात तास आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने सुळे यांनी भेट घेऊन काम सुरु करण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. या आश्वासनानंतर सुळे यांनी उपोषण मागे घेतले.
सुळे यांच्या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचारले असता त्यांनी खोचक टिका केली.सुळे यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देणं पहिल्यांदा अजितदादांनी टाळलं, पण नो कॉमेंट्स म्हणत त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग गेट या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दूरवस्था झाली आहे.हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी अनेक महिन्यापासून ग्रामस्थांनी केली होती. त्याचा सातत्याने सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला.
बनेश्वररस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता नो कॉमेंट्स म्हणत अजित पवार यांनी यावर उत्तर देणं टाळलं. पण त्याच वेळेस हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो खासदार निधीतून करता येऊ शकतो असं म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या सुप्रियाताईंना टोला लगावला आहे.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर मी माझे उपोषण मागे घेतले. हे काम विहीत वेळेत पुर्ण करण्याचा शब्द जर प्रशासनाने पाळला नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. त्यांच्या हिताची कामे सरकारने केली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करीत असतो परंतु सरकार आणि प्रशासनाकडून अडवणूक होत असेल तर नाईलाजाने संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. आशा आहे की सरकार अथवा प्रशासनाकडून यापुढे जनहिताच्या कामांबाबत अडवणूकीची भूमिका घेतली जाणार नाही, असे सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.