Mumbai Shooting: मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; काँग्रेस खासदारांनी फडणवीसांना विचारला जाब

Chembur Shooting Sadruddin Khan: अभिनेते सुरक्षित नाही, सैफ अली खान असेल भायखळ्यात खून असेल, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल, पोलिस करताय काय? असा संतप्त सवाल गायकवाड यांनी केला.
Chembur shooting Sadruddin Khan
Chembur shooting Sadruddin Khan newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Builder Shooting: मुंबईतील कायद्या सुव्यवस्था ढासळली असल्याचे पुन्हा एकदा दिसते. मुंबईत बुधवारी मध्यरात्री एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला.सदरुद्दीन खान, असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन खान यांनी विचारपूस केली. वर्षा गायकवाड यांनी यावेळी सत्ताधारी महायुतीच्या सरकारवर टीका केली.

सदरुद्दीन खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी सांगितले. हल्लेखोरांनी खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. खान यांच्या दाढेत एक गोळी अडकली आहे. मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन ती गोळी काढण्यात आली.

हल्ल्याच्या या घटनेवरुन महायुती सरकारला खासदार वर्ष गायकवाड यांनी धारेवर धरले आहे.'साडे नऊला भर वस्तीत हल्ला होतो.अभिनेते सुरक्षित नाही, सैफ अली खान असेल भायखळ्यात खून असेल, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल, पोलिस करताय काय? असा संतप्त सवाल गायकवाड यांनी केला. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप खासदार गायकवाड यांनी केला आहे.

Chembur shooting Sadruddin Khan
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे 'सेनापती' ठरले! राऊतांसह तीन 'वाघिणी'ही भिडणार

चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारात हा गोळीबार झाला. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. मध्य वस्तीत गोळीबाराची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला.

सदरुद्दीन खान ज्या गाडीत बसले होते. त्या गाडीतचा पंचनामा पोलिस करीत आहेत. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. गोळीबार झाला तेव्हा गाडीत खान यांच्यासोबत त्यांचा चालक बसलेला होता. फायरिंग झाल्यानंतर चालकाने घाबरून पुढे एक किलोमीटर पर्यंत गाडी पळवली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्याला जबाबदार मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस आहेत. मुंबई पोलिसांची स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना केली जाते आणि भर वस्तीत गोळीबार होतो, पोलिसांकडे याची माहिती नव्हती का?" असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com