Pune Congress sarkarnama
पुणे

Pune Congress BJP : काँग्रेस भवन बाहेर तुफान राडा! भाजप आक्रमक, सपकाळांचे टिपू सुलतानच्या वेशातील फोटो झळकावले

Harshvardhan Sapkal controversy : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून पुण्यात काँग्रेस-भाजप आमनेसामने आले. काँग्रेस भवनासमोर आंदोलनाची तयारी असून, भाजपने तक्रार दाखल केली तर काँग्रेसने जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबतच्या वक्तव्यामुळे भाजप आणि राज्यातील हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपने थेट पुण्यातील काँग्रेस भवनवर मोर्चा काढत निषेध झाला. काँग्रेस कार्यकर्ते देखील भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतो. पोलिस देखील मोठ्या संख्येने काँग्रेस भवन बाहेर उभे होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा टिपू सूलतानच्या वेशातील फोटो झळकावत घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते की, "ज्या पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आहे आणि त्यांनी स्वराज्याचा विचार दिला. अगदी त्याच पद्धतीने टिपू सुलतान यांनी देखील इंग्रजांविरोधात लढा दिला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे भूमिपुत्र होते. त्यामुळे कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्याअर्धाने शौर्याच्या दृष्टीने टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे."

टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांना समकक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटल्याने भाजप आक्रमक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांना लाज वाटायला हवी होती त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली.

याच दरम्यान पुण्यातील भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. अशा प्रकारचे विधान केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील भाजपकडून करण्यात येत आहे. एकीकडे तक्रार दाखल केली असताना दुसरीकडे भाजप काँग्रेस भवन येथे आज मोठं आंदोलन करत आहे.

या आंदोलनापूर्वी सकाळी पतीत पावन संघटनेकडून देखील काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यासाठी आली होती. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळ फासत त्यांचे पोस्टर देखील जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झाली.

याबाबत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मराठी अस्मितेचे दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान याच्याशी करण्याचा दुर्दैवी प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला आहे, या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

मात्र या आंदोलनाला काँग्रेस भवन समोर येण्यापूर्वीच काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. भाजपने काँग्रेस भवन मध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल. भाजपाला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने ते आंदोलन करावे जर त्याचे उल्लंघन करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते देखील त्याला जशास तसे प्रत्युत्तर देतील असं अरविंद शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT