Pune BJP : पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक कोण? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्या' उमेदवारांचा पत्ता कट...

Pune Municipal Corporation : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पुणे महानगरपालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवड बिनविरोध झाली. त्यानंतर आता स्थायी समिती, इतर समित्या आणि विशेषतः भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
Pune Municipal Corporation | BJP Accepted Corporators Policy
Pune Municipal Corporation | BJP Accepted Corporators PolicySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Feb : पुणे महानगरपालिकेत चार वर्षांच्या प्रशासक राजनंतर सोमवारी (ता.०९) बिनविरोध महापौर आणि उपमहापौर निवड झाली आहे. भाजपच्या मंजुषा नागपुरे या महापौरपदी तर रिपाइंचे परशुराम वाडेकर उपमहापौरपदी निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यानंतर आता स्थायी समिती, इतर समित्या आणि विशेषतः भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

याबाबत महापौर निवडीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत येऊन महत्वाचे विधान केले आहे. यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा मावळल्या असून टेन्शन देखील वाढलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपचे स्पष्ट धोरण आहे की, महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार नाही.

Pune Municipal Corporation | BJP Accepted Corporators Policy
Parbhani News: झेडपी अध्यक्षपदाचा मान मिळणार पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या मतदारसंघाला; लता वाकळेंची लागणार लॉटरी

स्वीकृत सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी नव्हे, तर केवळ अडीच वर्षांसाठी केली जाणार आहे. यामुळे सुमारे १४ कार्यकर्त्यांना ही संधी मिळेल. मात्र, प्राधान्य अशा कार्यकर्त्यांना दिले जाईल ज्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघटनात्मक काम करत आहेत."

या घोषणेमुळे निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे, जे स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून पुन्हा सभागृहात येण्याची शक्यता पाहत होते. दुसरीकडे, पक्षाच्या ग्राउंड लेव्हलवर वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या, पण आतापर्यंत सत्तेच्या फायद्यापासून दूर राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही संधी सोनेरी ठरणार आहे.

Pune Municipal Corporation | BJP Accepted Corporators Policy
Kolhapur ZP Election : महाडिक, आबिटकर, आणि पाटलांचे मनसुबे मुश्रीफांनी उधळले, भाजप शिवसेनेला गाफील ठेवलं, आता अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

मात्र, महापालिकेतील सत्तासमीकरणे आणि अंतर्गत गटबाजी लक्षात घेता, हा नियम कठोरपणे पाळला जाईल की काही नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तींसाठी अपवाद केला जाईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तसेच स्वीकृत नगरसेवकांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com