Poster War Erupts Against Bunty Patil Amid Internal Party Row Sarkarnama
पुणे

Pune Congress News: ‘कोल्हापूरात हरला, पुण्यात पक्ष सपाट केला’; बंटी पाटलांविरोधात पुण्यात पोस्टरवॉर

Pune Congress Posters Opposing Satej Patil: पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली असून काँग्रेसचे पुणे प्रभारी सतेज पाटील यांच्या विरोधात शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Political poster war in Pune Congress: पुणे काँग्रेसमध्ये गटबाजी, नाराजी आणि पोस्टरबाजी हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा काँग्रेस मधील नाराजी चव्हाट्यावर आली असून काँग्रेसचे पुणे प्रभारी असलेल्या बंटी उर्फ सतेज पाटलांच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी पाहायला मिळत आहेत.

नुकतेच पुणे शहरामध्ये नव्याने पुणे शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसने शहरासाठी दोन शहराध्यक्ष निवडले असून प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी या दोघांनाही ही जबाबदारी वाटून दिली आहे. मात्र या नियुक्तीनंतर काँग्रेस मधील काही गटांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांना थेट शहराध्यक्ष केल्याने ही नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या नेत्याला संधी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत.

पुणे शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून अनेक नेते इच्छुक होते. त्यामध्ये प्रामुख्याने माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांचा देखील समावेश होता. बागवे यांच्यामार्फत तत्कालीन शहर अध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांना बदलावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

अनेकदा बागवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांना भेटून शहराध्यक्ष बदलाची मागणी करताना पाहायला मिळालं. मात्र जेव्हा शहराध्यक्ष बदललं गेलं तेव्हा बागवे यांना डावलल्याने ते नाराज असल्याचे सांगितलं जात आहे.

शहराध्यक्ष पदाच्या ज्या नियुक्त झाल्या आहेत. त्या नियुक्त्यांमध्ये पुण्याचे प्रभारी असलेल्या बंटी पाटील यांची प्रमुख भूमिका मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.

पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये त्याबाबतचे पोस्टर लागल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टरवर कोल्हापूरच्या पैलवान पुण्यात आला, कोल्हापूरात हरला आणि पुण्यात ही पक्ष सपाट केला, असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

त्यासोबतच आमचा ठरल आहे कोल्हापूरचं पार्सल कोल्हापूरला पाठवायचा असही लिहिण्यात आलं आहे. पोस्टरच्या खाली काँग्रेस कार्यकर्ता असं नमूद करण्यात आले आहे. या गटबाजीमुळे नवनियुक्त शहराध्यक्षांची मात्र डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT