

Chhagan Bhujbal News: गेले दोन महिने सिंहस्थ कुंभमेळ्याचा रिंग रोड गाजतो आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दडपशाही चालवली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता अधिक तापला आहे.
रिंग रोड साठी भूसंपादन करताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. यात सदोष रस्ता आखणी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रश्नावर आता शेतकरी तीव्र संघर्षाच्या भूमिकेत आहेत.
रिंग रोड विरोधी शेतकऱ्यांनी काल (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास चर्चा केली. संदर्भात काढण्यात आलेला आदेश तातडीने रद्द करावा. सोमवारी सायंकाळपर्यंत नवा प्रस्ताव सादर करावा, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आदेश न निघाल्यास मंगळवारी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी जाब विचारण्यासाठी शेतकरी धडकतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड संदर्भात अनेक तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी आणि आपल्या मालमत्तांना संरक्षण देण्यासाठी हा रस्ता चुकीच्या पद्धतीने अखला आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी संघर्ष करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी मंत्री महाजन यांनी प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. मात्र दोन आठवडे उलटूनही त्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी आता मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर मोर्चा नेण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याचा कारभार पूर्णतः गिरीश महाजन यांच्या हाती आहे. सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या स्थितीत मोर्चा मात्र भुजबळ यांच्याकडे नेला जात असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.