Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अर्ज वाटप, प्रभागनिहाय बैठकांवर भर देण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी झाली तरीही आणि स्वबळावर निवडणूक लढण्यासाठीदेखील आम्ही तयार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, लता राजगुरू, अविनाश बागवे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.
पक्षाकडून आतापर्यंत 211 अर्ज गेले असून, 13 डिसेंबरपर्यंत अर्ज जमा करता येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही प्रभागनिहाय बैठका घेतल्या असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आमच्याकडे प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार आहेत. प्रदेश समिती आघाडीबाबत जो निर्णय घेईल, त्याचे आम्ही पालन करू. प्रत्येक ज्येष्ठ नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.’’
महापालिकेकडून प्रभागरचनेपासून ते मतदारयाद्यांबाबत प्रचंड गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी निधी उभारत आहे. भाजपला (BJP) निवडणुकीसाठी निधी मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या, वृक्षगणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. महापालिका हा निधी भाजपला निवडणुकीसाठी देत असल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. मतदारयादीतील दुबार नावे, मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांत जाणे, अशा प्रकारांमुळे मतदारयाद्यांचा गैरवापर सुरू असल्याचे अविनाश बागवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.