Pune congress Sarkarnama
पुणे

Pune Congress: रवींद्र धंगेकर, संगीता तिवारींच्या झटक्यानंतरही पुणे काँग्रेसमध्ये 'सन्नाटा ही सन्नाटा...'

Congress Politics : एक तळागळातला आणि कार्यकर्त्यांशी संपर्क असलेला नेत्याच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल घडतील अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, अद्यापतरी काँग्रेसमध्ये शांतताच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. विविध पदावरील नियुक्त्या, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या संवादाच्या माध्यमातून पक्षबांधणीचे प्रयत्न सुरू असताना, पुण्यातील काँग्रेस पक्ष मात्र संपूर्णपणे शांत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये काँग्रेसने (Congress) सपाटून मार खाल्ला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. पक्षाकडून नव्याने हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदावरती करण्यात आली. एक तळागळातला आणि कार्यकर्त्यांशी संपर्क असलेला नेत्याच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल घडतील अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, अद्यापतरी काँग्रेसमध्ये शांतताच असल्याचे पाहायला मिळत आहे.

पाटील पुन्हा आलेच नाही

सुरुवातीच्या काळात संघटनात्मक बदलाच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन सपकाळ यांनी निरीक्षकांच्या नियुक्त देखील केल्या आणि त्यांच्याकडून अहवाल देखील मागवले होते. पुणे शहर प्रभारी निरीक्षक म्हणून सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रभारी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सतेज पाटील (Satej Patil) यांनी या संदर्भात एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती.

या बैठकीमध्ये अनेकांनी बंटी पाटील यांच्याकडे आपली घाराणी मांडली. गटबाची देखील समोर आली. त्या पहिल्या बैठकीनंतर सतेज पाटील पुण्याकडे पुन्हा वळलेले नाहीत. त्यांनी पंधरा दिवसांत दुसरी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापपर्यंत ती बैठक झालेली नाही. त्यामुळे बंटी पाटील देखील पुण्यातील गटबाजीमुळे त्रस्त होऊन पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत का अशा देखील चर्चा सुरू आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

या पार्श्वभूमीवर, संघटनात्मक पातळीवर कोणताही ठोस बदल झाला नसल्याचे स्पष्ट दिसून येते. परिणामी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत.

अनेकांकडून इतर पक्षांची चाचपणी

तसेच, काँग्रेसच्या अंतर्गत एका मोठ्या गट अस्वस्थता असल्याचे वृत्त आहे. हा गट लवकरच पक्षांतराच्या दिशेने वाटचाल करू शकतो, अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे पुण्यातील काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीत मागे पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT