Pune Crime News | Minor Assault Case in Parvati Sarkarnama
पुणे

Pune Crime : 9 वर्षाच्या नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार; पुण्याच्या पर्वती परिसरातील घटना शेजाऱ्यांमुळे आली उजेडात, नेमकं काय घडलं?

Minor Assault Case in Parvati : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरामध्ये नऊ वर्षांची मुलगी आणि तिचे आजोबा दोघेच होते. हीच संधी साधून नराधम आजोबाने नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Sudesh Mitkar

Pune Crime News, 06 May : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पर्वती परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

केवळ नऊ वर्षांच्या चिमुरड्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 05) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पर्वती पायथा परिसरात ठिय्या आंदोलन केले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरामध्ये नऊ वर्षांची मुलगी आणि तिचे आजोबा दोघेच होते. हीच संधी साधून नराधम आजोबाने नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. त्या महिलेने प्रसंगावधान राखत घराच्या फटीतून डोकावून पाहिले असता, आजोबांचा घृणास्पद प्रकार सुरू असल्याचे समोर आले.

महिलेने तातडीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जमा केले. नागरिकांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने दार उघडण्यास नकार दिला. कारवाईच्या भीतीने आरोपीने चिमुरडीला घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवले आणि त्यानंतर दार उघडले.

मात्र, संतप्त नागरिकांनी घरात घुसून आरोपीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खटला 'फास्ट ट्रॅक'वर चालवणार

या गंभीर घटनेबाबत पुणे पोलिसांचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "पर्वती परिसरात आजोबांनी नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंदनीय आहे. पीडित मुलगी सुखरूप असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील गांभीर्य ओळखून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी हा खटला 'फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवण्याचा आमचा प्रयत्न असेल. असं शर्मा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT