Pune, Covid 19
Pune, Covid 19 File Photo
पुणे

पुण्याने गाठला कोरोना रुग्णांचा पाच लाखांचा आकडा

सरकारनामा ब्युरो

पुणे : देशात पहिल्या लाटेपासून कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने शुक्रवारी कोरोना रुग्णांचा पाच लाखांचा आकडा पार केला. राज्यात कोरोना रुग्णांची एवढी संख्या असलेलं पुणे हे दुसरं शहर ठरलं आहे. शुक्रवारी पुण्यात नवे 121 रुग्ण आढळून आल्यानंतर शहरानं पाच लाखांचा टप्पा ओलांडला. बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत सुमारे 4 लाख 89 हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांचा आकडा शुक्रवारी 65 लाख 37 हजारांच्या पुढे गेला. त्यापैकी 63 लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर सुमारे 1 लाख 39 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सुमारे 38 हजार 500 रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानुसार सध्या मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सात लाख 16 हजारांच्या पुढे गेला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण अधिक असले तरी पुणे व मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येची तुलनाच होऊ शकत नाही. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांचा विचार केल्यास पुणे हे आघाडीवर असल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी पुण्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पाच लाख 80 वर पोहचला. पुण्यात मागीलवर्षी नऊ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले. तर दुसऱ्या लाटेतही राज्यात पुण्यात दररोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. त्यामुळं दोन्ही लाटांमध्ये पुणे हे चिंतेचा विषय ठरलं होतं. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

पुण्यात दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णवाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा अधिक होता. रुग्णांना बेड मिळणेही कठीण जात होते. तसेच ऑक्सीजनचाही तुटवडा निर्माण झाला होता. पण जून महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. या काळात चाचण्याही मोठ्या प्रमाणावर झाल्या. त्यामुळे रुग्ण आढळून येण्याचंही प्रमाणही अधिक होतं. आतापर्यंत पुण्यात तब्बल 33 लाखा 22 हजार चाचण्या झाल्या आहेत. उपचारानंतर 4 लाख 89 हजारांहून अधिक नागरिकांना घरी सोडलं आहे. तर सध्या केवळ 1 हजार 581 जण सक्रीय रुग्ण आहेत.

पुणे शहरातील कोरोनाची स्थिती (ता. 24 सप्टेंबरअखेर)-

एकूण चाचण्या - 33 लाख 22 हजार 753

एकूण कोरोनाबाधित - 5 लाख 80

उपचारानंतर घरी सोडलेले - 4 लाख 89 हजार 485

एकूण मृत्यू - 9 हजार 14

सध्या उपचार घेत असलेले - 1 हजार 581

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT