थरारक : न्यायालयातच गँगवॉर...वकिलाच्या वेषात येऊन गँगस्टरचा खात्मा

कुख्यात गँगस्टरसह तिघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.
Rohini Court
Rohini CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी न्यायालयात (Firing At Rohini Court) शुक्रवारी थरार पाहायला मिळाला. न्यायालयात गँगवॉर भडकल्यानं पोलिसांनाही गोळीबार करावा लागला. यामध्ये एका कुख्यात गँगस्टरसह तिघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. गँगस्टरला मारण्यासाठी वकिलाच्या वेषभूषेत गुंड आल्याची माहिती समोर आली आहे.

गोगी गँग अन् टिल्लू गँगमध्ये मागील अनेक वर्षांपासून गँगवॉर सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूकडील 25 हून अधिक गुंड मारले गेले आहेत. गोगी गँगचा म्होरक्या असलेला जितेंद मान उर्फ गोगी याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी मार्च 2020 मध्ये अटक केली होती. गोगी मोस्टवाँटेड असल्यानं त्याला अटक करून पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं मानलं जात होतं. सध्या तो तिहार तुरूंगात होता.

Rohini Court
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास सहा महिने महिलांची कपडे धुण्याची शिक्षा

एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी गोगीला शुक्रवारी रोहिणी न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी दोन गुंड वकिलाच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी केलेल्या गोळीबारात गोगीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर मारले गेले. त्यापैकी एकाचं नाव राहुल असून त्याच्यावर 50 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.

न्यायालयातच गँगवार भडकल्यानं दिल्ली पोलिसही हादरले आहेत. दोन गुंडांचा जागेवर खात्मा केल्याबद्दल दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी पोलिसांचं कौतूक केलं आहे. पण हे गँगवॉर नसल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, गोगीवर दिल्लीमध्ये चार तर हरयाणामध्ये तीन लाखाचा इनाम जाहीर करण्यात आला होता. हरयाणा पोलिसांनी गायिका हर्षिया दहिया खून प्रकरणात इनाम जाहीर केला होता.

Rohini Court
बडे नेते अडचणीत; लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाच कोटी घेत केली फसवणूक

गोगीच्या गँगन् आम आदमी पक्षाचे नेते वीरेंद्र मान यांची 26 गोळ्या घालून हत्या केली होती. 2018 मध्ये गोगी व टिल्लू गँगमध्ये गँगवार झालं होतं. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू व पाच जण जखमी झाले होते. गोगी हा अलीपुर गावातील तर टिल्लू हा ताजपुरिया गावातील आहे. सुरूवातील हे दोघे मित्र होते. पण आता दोघींनी स्वतंत्र टोळी आङे. दक्षिणी पश्चिमी, द्वारका, बाहरी, रोहिणी, उत्तर आणि दक्षिण पश्चिम दिल्लीत झालेल्या गँगवारमध्ये या दोघांचा हात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com