mhada Exam
mhada Exam 
पुणे

म्हाडाचा पेपर फोडणाऱ्या तिघांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या तिघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) ही कारवाई केली आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार असल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याने सायबर पोलिसांनी रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.

प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परिक्षा घेणार्‍या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी आहे. तर संतोष आणि अंकुश हे त्याचे मित्र आहेत. मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रितेश देशमुखला सायबर पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा आजपासून सुरु होणाऱ्या परिक्षा ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टि्वट करत दिली. आव्हाडांनी विद्यार्थ्यांची क्षमा मागत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या आठवडाभर परिक्षा होणार होत्या होती. मात्र आता या सर्व परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिक्षा जानेवारी होतील, असेही मंत्री आव्हाड यांनी सांगितले आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. 'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' असे आव्हाडांनी आल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT