आरोग्य विभागाच्या परीक्षेसारखचं 'म्हाडा'चं झालं, आमची मानसिकता खचत आहे..

''पेपर पुढे ढकलला का ? पेपर फुटला हे असेल तर मग का त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तुम्हाला तर आधीच कळलं होत तर मग आधीच cancel करायला पाहिजे मॅडम , आम्ही परिस्थिती नसताना १०००-२००० खर्च करून बस बंद असल्याने औरंगाबादहून आलो
file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा (mhada exam 2021) पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

''पेपर पुढे ढकलला का ? पेपर फुटला हे असेल तर मग का त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तुम्हाला तर आधीच कळलं होत तर मग आधीच cancel करायला पाहिजे मॅडम , आम्ही परिस्थिती नसताना १०००-२००० खर्च करून बस बंद असल्याने औरंगाबादहून आलो. आता कळलं की exam cancel आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पण तसचं झालं. mhada पण तसचं, सरकार काय करणार तो पर्यंत आमची मानसिकता खचत आहे एका exam ला किती वेळेस जावे, अशी आमची परिस्थिती नाही, '' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना व्यक्त केली.

आरोग्य विभागाची परीक्षाही ऐनवेळी पुढे ढकलल्याने परीक्षार्थी त्रस्त झाले होते, आता म्हाडाची परीक्षा देखील काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे शनिवारी मध्यरात्री म्हाडाने पत्र प्रसिद्ध करून उमेदवारांना कळविले, तोपर्यत अनेक विद्यार्थी हे आपल्या गावाहून परीक्षा केंद्रांकडे रवाना झाले होते. प्रवाशात त्यांना ही परीक्षा पुढे ढकलल्याचे कळल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

म्हाडाच्या परीक्षा आजपासून सुरु होणार होत्या. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. आव्हाडांनी विद्यार्थ्यांची क्षमा मागत ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

file photo
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यार्थी संतप्त ; आव्हाडांनी माफी मागितली

'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' असे आव्हाडांनी आल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आव्हाडांच्या टि्वटनंतर विद्यार्थी संतप्त झाले असून सोशल मीडियावर आव्हाड आणि महाविकास आघाडी सरकारला टीका होत आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईकडून विविध पदांच्या (mhada exam 2021)भरती प्रक्रिया सुरु आहे. कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ जागा रिक्त आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com