Digital Arrest' Fraud Sarkarnama
पुणे

Digital Arrest Scam Pune : पुण्यात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! सीबीआय अधिकारी, काळा पैसा अन् एका फोन कॉलने उडवली झोप; पाहा नवा पॅटर्न

Pune Digital Arrest Scam : पुण्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बनावट सीबीआय अधिकाऱ्यांचा फोन करून काळ्या पैशाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी. जाणून घ्या सायबर फसवणुकीचा नवा पॅटर्न.

Sudesh Mitkar

Pune News : डिजिटल अरेस्ट हा नवा पॅर्टन पुण्यात समोर आला आहे. बिहार यूपी मधून होणाऱ्या डिजिटल अरेच्या घटना आता पुण्यामधून देखील होऊ लागल्या असल्याचं समोर आला आहे. डिजिटल अरेस्टचा नवा पुणे पॅटर्न पोलिसांपुढे उघड झाला आहे.

काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचे व्यवहार झाले आहेत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सीबीआय अटक करणार आहे. अशी भीती दाखवून तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावत दोन सायबर चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

'तुमचे खाते मनी लॉण्डरिंग प्रकरणात अडकले असून, सीबीआय तुम्हाला डिजिटल पद्धतीने अटक करत आहे,' अशी बतावणी केली. कुटुंबालाही तुरुंगात जावे लागेल, असे वारंवार धमकावून आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला आरोपींच्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. भीतीपोटी फिर्यादीने वेळोवेळी एकूण १० कोटी ७४ लाख रुपये चोरट्यांनी दिलेल्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी ज्या खात्यात पैसे गेले, त्या खात्यांची तांत्रिक तपासणी केली. तसेच, आरोपींनी पुण्यातील ज्या एटीएममधून पैसे काढले होते, त्या भागातील सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक धागेदोरे जुळवत सायबर पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि त्यांना कर्वेनगर परिसरातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

तसेच, त्यांच्या बँक खात्यातील ४० लाख रुपयांची रोकड तत्काळ 'फ्रीज' (गोठवण्यात) आली आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हर्षद सुभाष धनतोले (वय २३), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. या दोघांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर संपर्क साधून आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT