NCP leaders celebrate victory as Ajit Pawar-led party secures majority municipal councils in Pune district, emerging as the dominant political force in local body elections. Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ’ : 17 पैकी 10 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, भाजपाला अवघ्या 3 जागा

Pune municipal results : पुणे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 10 जागा जिंकत अजित पवारांचे वर्चस्व सिद्ध केले, भाजप व शिवसेनेला मर्यादित यश मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची लिटमस टेस्ट असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज रविवारी (ता.21) झाली. या मतमोजणीत पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगरपालिकांवर राष्‍ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्याचे अजित पवारच ‘दादा’ असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवसेनेला 4 आणि भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा न मिळाल्याने मोठी पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नगरपालिकेतील भरघोस यशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झाले आहे. तर शिवसेना आणि भाजप जिल्हा परिषदेसाठी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि चाकण या 4 नगरपालिकांची जबाबदारी जुन्नरचे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर देण्यात आली होती. या चारही नगरपालिकांवर शिवसेनेने भगवा फडकवून पक्षाची ताकद दाखवून दिले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेल्या मंचरच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारत राजश्री गांजळे विजयी झाल्या आहेत.

इंदापूरला प्रतिष्ठेच्या झालेल्‍या निवडणुकीत भरत शहा विजयी झाले आहेत. त्यांनी बंडखोर प्रदीप गारटकर यांचा पराभव केला. सासवडला काँग्रेस मधून भाजपात आलेले संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप विजयी झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून भाजपापाचे जिल्ह्यातील खाते उघडले आहे. तर भाजपाला तळेगाव आणि आळंदी येथे विजय मिळवत, 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नगरपालिकानिहाय विजयी नगराध्यक्ष आणि पक्ष

  • - बारामती - सचिन सातव (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - लोणावळा - राजेंद्र सोनवणे - (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - दौंड - दुर्गादेवी जगदाळे - (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - तळेगाव दाभाडे - संतोष दाभाडे (भाजपा महायुती)

  • - चाकण - मनिषा गोरे (शिवसेना)

  • - जुन्नर - सुजाता काजळे (शिवसेना)

  • - आळंदी - प्रशांत कुऱ्हाडे (भाजप) (BJP)

  • - शिरूर - ऐश्‍वर्या पाचर्णे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - सासवड - आनंदी काकी जगताप (भाजप)

  • - जेजुरी - जयदीप बारभाई (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - भोर - रामचंद्र आवारे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - इंदापूर - भरत शहा (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - राजगुरूनगर - मंगेश गुंडाळ (शिवसेना)

  • - वडगाव - आबोली ढोरे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - माळेगाव बुद्रुक - सुयोग सातपुते (राष्‍ट्रवादी काँग्रेस)

  • - मंचर - राजश्री गांजळे (शिवसेना)

  • - फुरसुंगी ऊरूळी देवाची - संतोष सरोदे (राष्‍ट्रवादी काँग्रेस) (NCP)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT