Pune, 30 Jan 2025: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला वगळल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पुरंदर विधानसभा शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना आज होणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून वगळलं असल्याची माहिती समोर येत आहे. (Vijay Shivtare Removed From DPDC)
शिवतारे यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थान देण्यात आले आहे. शिवतारे यांना बैठकीसाठी डावलल्याने पुण्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय निर्णयासाठी आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या पुणे जिल्हा नियोजन समिती आणि त्या समितीत असलेल्या सदस्यांना महत्वाचे स्थान असते. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. नव्या नियुक्त्या कधी होणार व कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना नव्या सदस्यांची नावे समोर येत आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शेळके आणि कुल यांचा नावाचा समावेश आहे. या नियुक्यांमुळे पुणे जिल्ह्यातील राजकारणावर अजित पवार यांचा कसा दबदबा आहे, हे स्पष्ट होते.
जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ व संसद यांतून दोन सदस्यांची राज्य सरकारकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करता येते. त्यानुसार पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून मावळचे आमदार सुनिल शेळके आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे. सुषमा कांबळी अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी याबाबत शासन परिपत्रक जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.