Donald Trump: राजीनामा द्या, 8 महिन्याचा पगार घ्या! डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्मचाऱ्यांना दिली डेडलाईन

Trump offers millions of federal workers eight months pay to resign: अमेरिकन सरकारमधील बदलांपैकी मोठा बदल असणारा हा प्रस्ताव आहे. 'व्हाइट हाऊस'चा हा ऐतिहासिक निर्णय असेल. स्वेच्छानिवृत्तीसाठी 'व्हाइट हाऊस'ने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

US Federal Employees Buyout:अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या एका निर्णयाची सध्या सरकारी नोकरदार वर्गात मोठी चर्चा आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्या कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी अजब निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी 6 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली आहे.

Donald Trump
Dhananjay Munde: देवाभाऊंची पहिली लिटमस टेस्ट; धनूभाऊ राजीनामा देणार का? दिल्ली हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याला आठ महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे. अमेरिकन सरकारमधील बदलांपैकी मोठा बदल असणारा हा प्रस्ताव आहे. 'व्हाइट हाऊस'चा हा ऐतिहासिक निर्णय असेल. स्वेच्छानिवृत्तीसाठी 'व्हाइट हाऊस'ने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. यात चार पर्याय सरकारने दिले आहेत.

'कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कार्यालयात येऊन काम करावं लागेल, असे केल्याने कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचा पर्यायही नोटीशीत दिला आहे. त्याखेरीज या नोटीशीमध्ये राजीनामा पत्रही आहे. ज्यांना राजीनामा द्यायचा आहे, ते लगेचच राजीनामा देऊ शकतात, असे यात नमूद केले आहे.

Donald Trump
Mahakumbh 2025 Live : चेंगराचेंगरीनंतर भाजप खासदारानं महाकुंभमध्ये केलं शाही स्नान; सनातन हा जगातील एकमेव धर्म

स्वेच्छानिवृत्तीसाठी नोटीस मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वेच्छानिवृत्तीचा हा प्रस्ताव कर्मचाऱ्यांचे अधिकारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com