Pune Drug Case Sarkarnama
पुणे

Pune Drug Case : पुण्यातला तो बार 'पतित पावन'ने फोडला!

Drugs Party in Pune Hotel Video Goes Viral : नाराजी कुठेतरी बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे. एका संघटनेकडून या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील एफसी रोड येथील एका बारमध्ये सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यामुळे पोलिस व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत मोठे अटक सत्र राबवले आहे.

मात्र, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. हीच नाराजी कुठेतरी बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे. एका संघटनेकडून या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे.

एफसी रोडवरील (Pune) 'एल थ्री' बारच्या स्वच्छतागृहामध्ये काही तरुण बाथरूमच्या सीट वरती बसून अमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. याबाबत माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केले आहे.

हॉटेल सचिन कामठे आणि संतोष कामठे यांच्या मालकीचे आहे. मात्र, त्यांनी तो भाडेतत्त्वावरती रवी महेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना चालवण्यासाठी दिला होता. दरम्यान शनिवारी अक्षय कामठे या व्यक्तीने 50 ते 60 लोकांना या ठिकाणी पार्टी करायची असल्याचं सांगितलं.

पार्टी करण्यास बार चालकांनी देखील परवानगी दिली. ही पार्टी सुमारे सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. याच पार्टीमध्ये अमली पदार्थ सेवन झाल्याचा संशय पोलिसांना (Police) आहे.

आतापर्यंत पोलिसांकडून आठ जणांना अटक करण्यात आली असून पार्टीचे आयोजन करणाऱ्या अक्षय कामठेला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पोलिसांकडून चार संशयींचा शोध घेण्यात येत आहे. नेमकं या पार्टीमध्ये ड्रग्स घेण्यात आले का? आणि घेतलं असल्यास हे ड्रग्स नेमकं कुठून आलं याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान सातत्याने घडत असलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. हीच खदखद कुठेतरी आज बाहेर निघाल्याचं पाहायला मिळालं. काही कार्यकर्त्यांनी हॉटेल जवळ जात घोषणाबाजी करत हॉटेलची तोडफोड केली. याबाबाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT