Pune Drugs Case sarkarnama
पुणे

Video Pune Drugs Case : मोठा दणका! ड्रग्ज व्हिडिओ प्रकरणी पोलिस निरीक्षकासह चार जण निलंबित

Pune Drugs Case police inspector suspended : ड्रग्ज व्हिडिओ प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हॉटेलचे मालक, मॅनेजर यासह कर्मचारी यांचा समावेश आहे.

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील हॉटेलमध्ये कॉलेज तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपक शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने, सहायक पोलिस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यासह दोन बीट मार्शल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हॉटेलचे मालक, मॅनेजर यासह कर्मचारी यांचा समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण पुण्यात समोर आले होते. पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निर्मिती होत असून त्याचं इंटरनॅशनल रॅकेट सुरू असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

त्यातच आता एफसी रोड वरील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने विद्येचे माहेरघर असलेले पुणे ड्रग्जचे केंद्र बनले आहे की काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एफसी रोड वरील एल 3 नावाच्या बारमध्ये ही पार्टी सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी Police आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन कारवाई केली आहे.

ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर राजकीय नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांनी देखील या प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आहे.

दुसऱ्या दाराने बारमध्ये प्रवेश

पोलिस दलातील 2 बिट मार्शलचे निलंबन कामात हलगर्जीपणा केल्याने केल्याचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी सांगितले. तसेच त्या बारमध्ये दिलेल्या वेळे पेक्षा अधिक वेळेपर्यंत ते सुरू होते. मध्यरात्री दीडनंतर बारचे मुख्य प्रवेश द्वार बंद केले. त्यानंतर दुसऱ्या गेटने आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच एल 3 बार सील करण्यात आला असल्याचे पोलिस उपायुक्त गिल यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT