लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) विजयी झाले आहेत.
खासदार झाल्यानंतर भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. संदिपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील आणि चंद्रकात खैरे यांचा पराभव केला.
भुमरे यांच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी भूमिका घेतली आहे.
लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर १४ दिवसांत २ पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदीपान भुमरे हे आता दिल्लीत खासदार राहतील. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता भुमरेंकडे राहिला नाही. भुमरेंकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आले आहे असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.
भुमरेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्याकडील रोहयो, फलोत्पादन खाते व पालकमंत्रिपदही रिक्त झाले आहे. त्या पदावर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेअंतर्गत जोरदार स्पर्धा लागली आहे. अनेकांनी त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.