Pune Election 
पुणे

Pune Election: पुण्यात मतदानाचा गोंधळ! दुसऱ्यानेच दिलं मत, मूळ मतदाराला पुन्हा संधी

Pune Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. यावेळी शहरभर विविध मतदारसंघात अनेक गैरप्रकार पाहायला मिळाले.

Amit Ujagare

Pune Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. यावेळी शहरभर विविध मतदारसंघात अनेक गैरप्रकार पाहायला मिळाले. त्यातच दुसरीच व्यक्ती एका महिलेच्या नावावर मतदान करुन गेल्याचं उघड झालं. त्यामुळं मूळ मतदाराला निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची संधी दिली. म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावे दोनदा मतदान पार पडलं आहे. पण ते ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीनं. या प्रकारामुळं निवडणूक प्रक्रियेत किती अनागोंदी कारभार सुरु आहे याची प्रचिती आली.

नेमका प्रकार काय?

पुण्यातील प्रभाग क्रमांक २१ मधील कटारिया हायस्कूल या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. यामध्ये तीन महिलांनी आरोप केला की, आमच्या नावावर इथं आधीच कोणीतरी मतदान करुन गेलं आहे. पण तरीही त्यांना पुन्हा मतदान करायला लावलं. तसंच मयत मतदारांची कुठलाही यादी निवडणूक आयोगाकडं उपलब्ध नाही. एका महिलेनं सांगितलं की, खऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे.

दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं की, मी माझं ओळखपत्र दाखवलं तर त्यांनी माझं नाव तपासलं आणि मला सांगितलं की, तुमचं मतदान झालं आहे. तथंच बसलेल्या एका निवडणूक कर्मचाऱ्यानं एक फाईल तपासली तर त्यांनी सांगितलं की, इथं तुमची सही देखील झालेली आहे. त्यामुळं पहिल्यांदा तर मला मतदान करायला मिळालं नाही त्यानंतर त्यांनी मला एक कागद दिला आणि यावर सही करा म्हटलं. पण मी नाही म्हटलं, मी अशा कोणत्याही कागदावर सही करणार नाही. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, तुमचं तिकडंच मतदान रद्द होऊन इकडं येईल, जर बोगस मतदान झालं असेल तर.

दरम्यान, यामध्ये एका महिलेचं आधीच मतदान झालेलं असताना तिनं निवडणूक अधिकऱ्यांवर जबाव वाढवल्यानं त्या महिला अधिकारी दबाव वाढवल्यानंतर त्यानंतर त्या महिलेचं पोस्टल मतदान करुन घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT