BJP Flex News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनधिकृत फ्लेक्स लावून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, यापुढे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून शहर घाण करू नये असे, आदेश भाजपतर्फे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावू नये असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपनेही कडक भूमिका घेत यापुढे कोणत्याही परिस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आता याचे भविष्यात किती पालन होणे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची रविवारी (ता. ११) प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओके यांनी घेतली. पुण्यातील १०४ ठिकाणी थेट दाखवण्यात आली. या उपक्रमात सुमारे ५५ हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘घर चलो’ अभियानांतर्गत शहरातील २ हजार ६०० बूथपर्यंत घरोघरी जाऊन भाजपने विकासाचा अजेंडा नागरिकांपर्यंत पोचविला. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास, पारदर्शक प्रशासन आणि पुण्याच्या भविष्यातील प्रगती यावरच भाजपचा भर दिला, अशी माहिती पांडे यांनी दिली.
भाजप राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक लढवत आहे, त्यापैकी पुणे हे एकमेव शहर असून, येथे भाजप कमळाच्या चिन्हावर सर्व १६५ जागा लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या सात महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची उद्या (ता. १३) सायंकाळी पाच वाजता सांगता होत आहे. त्यापूर्वी गोखलेनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचाराची सांगता सभा होणार आहे. दरम्यान, यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता ही शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात गोखलेनगर येथील कुसाळकर चौकात घेतली होती. आता महापलिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभाही याच चौकात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.