muralidhar mohal ,ravindar dhangekar  sarkarnama
पुणे

Pune Election Result : मुरलीधर मोहोळ यांची मोठी आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर १९ हजारांचे मताधिक्य

Maharashtra Lok Sabha Election Results : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एक्झिट पोलमध्ये आघाडीवर दाखवण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील आपणच विजय होणार हा विश्वास रवींद्र धंगेकर यांना होता. मात्र मतमोजणीच्या पहिला फेरी पासून मोहोळ यांनी आपली आघाडी कायम ठेवल्याचं दिसून आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये अखेर आता भाजप महायुतीच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एक्झिट पोलमध्ये आघाडीवर दाखवण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील आपणच विजय होणार हा विश्वास रवींद्र धंगेकर यांना होता. मात्र मतमोजणीच्या पहिला फेरी पासून मोहोळ यांनी आपली आघाडी कायम ठेवल्याचं दिसून आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीचे मुरलीधर मोहळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यासह एमआयएमचा देखील उमेदवार रिंगणात होता. मात्र खरी लढाई ही महाविकासाकडे आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये शेवटी रवींद्र धंगेकर यांनी चुरस आणली होती. काँग्रेसने देखील या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली पूर्ण ताकद लावून नागपूर येथील दहा आमदारांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह केलं होतं. मात्र याचा फारसा फायदा धंगेकर यांना झालेला पहिला मिळत नाही.  

एक्झिट पोलमध्ये  मोहोळ यांचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केल्याचे पाहायला मिळाले . याला काउंटर करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील समोर येऊन रवींद्र धंगेकर यांचा विजय होणार असून एक्झिट पोल खोटे ठरतील असं सांगताना पाहायला मिळाले.

मात्र चौथ्या फेरी अखेर मुरलीधर मोहोळ यांना एक मोठी आघाडी मिळाली असून ते 18919 पुढे आहेत. तर रवींद्र कमी कर हे पिछाडीवर असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुढील फेऱ्यांमध्ये देखील असेच चित्र राहील अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे. तिसऱ्या फेरी अखेर मोहळ यांना ८७१२२ इतकी मत पडली असून  धंगेकर ६८२०३ इतकी मत आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT