Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर यांना विजयाचा फुल कॉन्फिडन्स असताना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मात्र महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ हे ५४०० मतांनी आघाडीवर आहेत. हि विजयी आघाडी शेवट पर्यंत कायम राहील असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आहे.
पुण्यात गेली सलग ८० दिवस रंगलेल्या राजकीय 'दंगली'त कोणाचे 'मंगल' होणार अर्थात, भाजपचे मुरलीधर मोहोळ की काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचे 'मंगल' होणार, याकडे अवघ्या राजकीय पटलाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण गुलाला माखणार, याची चर्चा असतानाच, धंगेकर मात्र प्रचंड 'कॉन्फिडन्स' ठेवून मतमोजणीसाठी म्हणजे, मंगळवारी सकाळीच घराबाहेर पडले. नेहमीसारखे 'फ्रेश' असलल्या धंगेकरांनी सकाळी शाब्दिक दांडपट्टश (मिश्लिकपणे) फिरवला आणि धंगेकर गुलाल उधळणार नाहीत, मात्र, धंगेकरांसाठी पुणेकरच गुलाला न्हाऊन निघतील, अशी मिश्किल टिप्पणी करीत धंगेकरांनी आपण दिल्लीत जाणार असल्याचा दावा ठोकला. तेव्हाच, धंगेकर देवदर्शनासाठी कसबा गणपती मंदिराच्या दिशेने गेले. दुसरीकडे, मोहोळ हे विजयाच्या खात्रीने सकाळीच घराबाहेर पडले. परंतु, पुण्याचा खासदार मोहोळ की धंगेकर हे अधिकृतपणे जाहीर होईलः पण त्यासाठी पुढचे पाच-तास वाट पाहावी लागणार आहे.
पुण्यातील जागा काही केल्या प्रचंड मतांनी पुन्हा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, मोहोळांना हरविण्यासाठी 'गनिमी कावा' करणाऱ्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी चांगलीच हवा केली आहे. त्यामुळे पुण्याचा निकाल फिरण्याचे अंदाजही बांधले गेले. परिणामी, पुणे जिंकणे भाजपला सोपे नसल्याचेच राजकीय वर्तुळातील चर्चेतून पुढे आले. अशातच पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे जिंकतील, असे दोन दिवसांआधी 'एक्झिट पोल'ने दाखवून दिले. मात्र, त्यांचे 'मार्जिन' किती असेन, याकडे लक्ष राहणार आहे. पण, या निवडणुकीत आपण जिंकणार असल्यावर धंगेकर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे मी नव्हे माझ्यासाठी पुणेकर गुलाला खेळतील, असे सांगून धंगेकरांनी निकालाची उत्सुकता वाढवून दिली.
लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीष बापट यांना जवळपास ३ लाख २० हजारांचे लीड होते. म्हणजे, या निवडणुकीत त्यांना सव्वासहा लाख मते मिळाली होती. पुण्यात २०१४ पासून भाजपची ताकद वाढली असून, या काळात पुण्यातील ८ आमदार भाजपचे राहिले. त्यानंतर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाचे ९९ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपचे एकहाती वर्चस्व असल्याचे कागदावरील ताकदीने दिसून येते. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्य धंगेकरांनी भाजपपुढे आव्हान उभे केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात धंगेकरांनी काहीशी फिरवल्याचे चित्र दिसून आले. मात्र, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवकांच्या आकड्याला शोभेल इतके लीड मोहोळांना असणार का, याची चर्चा रंगली. त्यात, भाजपच्या एका माजी खासदाराने मोहोळांना पाडण्यासाठी धंगेकरांना छुपी रसद पुरविण्याचा मुद्दा पुढे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.