Pune Municipal Corporation: Sarkarnama
पुणे

Pune News : पुण्यात थरारक घटना; शिवीगाळ करत महिलेने महापालिका अधिकाऱ्यावर ओतले पेट्रोल!

Dhayari Women Attempt To Pour Petrol On Officer In Pune : पुण्यात सिंहगड रोड भागात आज मोठी घटना घडली. या घटनेने पुणे शहर हादरले आहे...

Sachin Fulpagare

Pune Sinhagad Road News : पुणे शहर आणि जिल्हा गेल्या काही महिन्यांत कोयता गँग, हत्यांच्या घटनेने चर्चेत आहे. आता पुणे शहरात आणखी एक थरारक घटना घडली आहे. अतिक्रमणावर कारवाई केल्याच्या रागातून अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य एका महिलेने केले आहे. या थरारक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे.

कुठे आणि कशी घडली घटना?

ही घटना पुण्यातील सिंहगड रस्ता भागात घडली आहे. अतिक्रमण कारवाई केल्याच्या रागातून एक महिला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात गेली. तिथे अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षकावर तिने पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर महिलेने सुरक्षारक्षकांना शिवीगाळही केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News )

कोण आहे महिला अन् काय केले तिने?

चंद्रकला सोमनाथ निलंगे (वय ४५, रा. ताराई सोसायटी, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक लक्ष्मण जोंधळे यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्त्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. कारवाई केल्याचा राग आल्याने निलंगे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आली. तिने बाटलीत पेट्रोल आणले होते. कारवाई केल्याने निलंगेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने बाटलीत पेट्रोल आणले होते. बाटली घेऊन ती जोंधळे यांच्या अंगावर धावून गेली. सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. तेव्हा तिने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली. ( Pune Municipal Corporation News )

सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, धमकाविल्याप्रकरणी निलंगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT