Eknath Shinde ShivSena Sarkarnama
पुणे

Eknath Shinde ShivSena : भलतेच नखरे! 'त्या' माजी आमदाराची पक्षात येण्यासाठी शिंदेंकडे भरमसाठ डिमांड

Pune Ex-MLA Eknath Shinde ShivSena Maharashtra Politics MLA Demand Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने जाण्यासाठी पुण्यातील माजी आमदाराने ठेवलेल्या अटी-शर्तींची जोरदार चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातून काही माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. यामध्ये ठाकरे शिवसेनेमध्ये असलेल्या दोन माजी आमदार आणि काँग्रेसच्या एका माजी आमदाराची चर्चा आहे.

सध्या प्रचंड चर्चेत असलेले या माजी आमदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष प्रवेश करण्यासाठी काही डिमांड ठेवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अटी आणि शर्तींवर पक्षात येणाऱ्यांना एकनाथ शिंदे पक्षात घेणार का? आणि त्यांच्या अटी मान्य करणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

काँग्रेसमध्ये (Congress) नाराज असलेले आमदारांचे व्हाट्सअप स्टेटस आणि फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून या नेत्याकडून आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या काही भेटीगाठींमुळे हा माजी आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाईल, अशा जोरदार चर्चा आहेत.

मात्र या आमदाराने पक्षप्रवेशासाठी काही डिमांड एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडे ठेवल्याचं बोललं जात आहे. यामध्ये विधान परिषद किंवा म्हाडाचे अध्यक्षपद, महापालिकेच्या 17 ते 20 जागा आणि शहराध्यक्षपद, अशी मागणी या आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेकडे केल्याचे समजते.

शिंदे यांच्या शिवसेनेची पुणे शहरात फारशी ताकद नाही. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या पाच माजी नगरसेवकांनी देखील, शिंदेच्या शिवसेनेला पसंती न देता भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे शिवसेनेकडे सध्या शहरात कोणतही मोठा चेहरा नाही. शहराध्यक्ष असलेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी 'मिशन टायगर' राबवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

शिंदेंच निर्णय घेणार...

ही राजकीय स्थिती ओळखूनच काँग्रेसच्या त्या माजी आमदाराने, माझ्याकडे जबाबदारी द्या, मी शहरात पक्ष वाढवून दाखवतो, अशी ऑफर दिल्याचे समजते. शिंदे शिवसेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठांबरोबर त्यांच्या प्राथमिक बैठका झाल्या. त्यात त्यांनी शहरात तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल, तर भाजपबरोबर छुपी राजकीय लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो, असे सांगितल्याची माहिती मिळाली, माझा राजकीय फायदा पक्षाला मोठी राजकीय ताकद मिळवून देईल, असेही या माजी आमदाराने सांगितले असल्याचे कळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची सगळी माहिती गेली असून तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले आहे.

25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT