
Maharashtra politics update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदांवर केलेल्या विधानावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
भाजपचे विधान परिषदेतील सभापती प्रा. राम शिंदे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या विधानाला फटकारले आहे. 'मर्यादा पाळल्या पाहिजेत', असा टोला प्रा. राम शिंदेंनी लगावला.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, "विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती आणि उपसभापती हे पद संवैधानिक आहे. कायद्याच्या दृष्टीने हे पद उच्च आहे. त्याची गरिमा वेळी आहे. त्याचा आदर बाळगलाच पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्याला एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले, तरी मर्यादा पाळल्या पाहिजे".
अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर प्रा. शिंदे यांनी ते त्यांचे मत असू शकेल. मात्र जिल्हा विभाजनाबाबत सभागृहात विषय उपस्थित झाला, तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल, हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहिलं असल्याचे सांगितले.
पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसेच अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाच्या आडून चालेल्या सत्ताधाऱ्यांच्या गुंडगिरीवरून खासदार नीलेश लंके यांनी टीका करत नगरचा बिहार झाला आहे. यावर राम शिंदे यांनी यावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्म वर्ष सोहळा 31 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने चौंडी विकासाचा बृहत आराखडा तयार करून, त्याबाबत बैठक घेण्याच्या सूचना केल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.