Pune BJP Former Leader Pravin Vaste Death  Sarkarnama
पुणे

Pune BJP News : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद वस्ते यांचं निधन

Pune BJP Former Leader Pravin Vaste Death News: पुणे शहर भाजपचे चिटणीस म्हणून त्यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी पुणे शहर चिटणीस प्रवीण ऊर्फ विनोद कृष्णराव वस्ते (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रवीण वस्ते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त झाली.

प्रवीण वस्ते यांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून लक्ष्मीनगर (पर्वती) परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. २००२ ते २००७ या कालावधीत ते नगरसेवक होते. आपल्या नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी परिसरातील नागरी प्रश्नांकडे लक्ष देत नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

महापालिकेतील कामासोबतच प्रवीण वस्ते यांचा भाजपच्या संघटनात्मक कामातही सक्रिय सहभाग होता. पुणे शहर भाजपचे चिटणीस म्हणून त्यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला. त्यामुळे राजकीय क्षेत्रातही त्यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क होता.

वस्ते कुटुंबाचे पुणे महापालिकेच्या राजकारणाशी असलेले संबंधही जुने आहेत. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांचे प्रवीण वस्ते हे दीर होते. त्यामुळे महापालिका आणि शहराच्या राजकीय वर्तुळात त्यांचे जवळचे संबंध होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT