Teacher Recruitment: शिक्षक भरती आता कॅमेऱ्याच्या नजरेत; मुलाखतींचे होणार रेकॉर्डिंग?

Maharashtra Teacher Recruitment 2026: प्राध्यापक भरतीमध्ये ज्याप्रमाणे मुलाखतीचे चित्रीकरण केले जाते, त्याच पद्धतीने शिक्षक भरतीतील मुलाखतीही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली घेण्याचा विचार आहे.
Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment 2026Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: : शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. प्राध्यापक भरतीच्या धर्तीवर आता शिक्षक भरतीतील मुलाखतींचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे मुलाखतीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५च्या आधारे मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर आता मुलाखतीसह शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार असून, ही प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर खासगी शिक्षण संस्थांमध्ये मुलाखतीच्या नावाखाली होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. प्राध्यापक भरतीमध्ये ज्याप्रमाणे मुलाखतीचे चित्रीकरण केले जाते, त्याच पद्धतीने शिक्षक भरतीतील मुलाखतीही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली घेण्याचा विचार आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2026
CBSE Board Exam Marking: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सॅम्पल पेपर, मार्किंग स्कीम जाहीर; सीबीएसईचा मोठा निर्णय

पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या ‘मुलाखतीसह भरती’ प्रक्रियेत खासगी व्यवस्थापनांना एका पदासाठी तीन उमेदवारांची शिफारस करता येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांचे मूल्यांकन १०० गुणांच्या आधारे केले जाणार आहे. त्यापैकी ९० गुण हे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि शैक्षणिक पात्रतेवर आधारित असतील. उर्वरित १० गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी असणार आहेत.

Maharashtra Teacher Recruitment 2026
Teacher Salary: मोठी बातमी! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार 'या' तारखेलाच बँक खात्यात जमा होणार; सरकारचा आदेश

मुलाखतीच्या प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय तपासला जात आहे. शिक्षण विभागाच्या तंत्रज्ञान सहाय्यकांच्या मदतीने अशी व्यवस्था उभी करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2026
Teacher Salary: मोठी बातमी! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार 'या' तारखेलाच बँक खात्यात जमा होणार; सरकारचा आदेश

शिक्षण विभागाच्या या भूमिकेमुळे मुलाखतीतील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी प्राध्यापक भरतीच्या मुलाखतींचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण किंवा रेकॉर्डिंग करण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. शिक्षक भरतीतही अशाच प्रकारची व्यवस्था लागू करण्याच्या दिशेने चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com