Pune’s Hadapsar industrial zone suffers from intense odour due to mismanaged garbage plants. The municipal corporation now proposes a ₹49 crore solution involving culture powder to tackle this persistent issue Sarkarnama
पुणे

Pune garbage project : पुण्यातील कचरा प्रकल्पाची दुर्गंधी टाळण्यासाठी अनावश्यक खर्च; 'इको चीप' विरुद्ध ठेकेदाराची पावडर

Pune waste management : शहरातील कचरा प्रकल्पामुळे होणारी दुर्गंधी ही अनेक पुणेकरासमोरची मोठी समस्या बनली आहे. पालिकेने ज्या ठेकेदाराला कचऱ्याचं व्यपस्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे. ते ठेकेदार मनमानी कारभार करतात.

सरकारनामा ब्युरो

Pune News, 16 Jul : शहरातील कचरा प्रकल्पामुळे होणारी दुर्गंधी ही अनेक पुणेकरासमोरची मोठी समस्या बनली आहे. पालिकेने ज्या ठेकेदाराला कचऱ्याचं व्यपस्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे. ते ठेकेदार मनमानी कारभार करतात. अनेकदा ठेकेदाराकडून योग्य उपाययोजना न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

तर आता नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी करण्यात येणाऱ्या औषध फवारणीसाठी महापालिका पाच वर्षांत 49 कोटी 63 लाख रुपये खर्च करणार आहे. यातील एकूण खर्चापैकी आता 21 कोटी 83 लाख 15 हजार 625 रुपयांचा खर्च कल्चर पावडरसाठी होणार असल्याचं ठेकेदाराने दाखविले आहे.

मात्र, ठेकेदाराने दाखवलेल्या खर्चाच्या तुलनेत महापालिका मागील काही वर्षांपासून जी कल्चर पावडर वापरते ती स्वस्त आहे. त्यामुळे ठेकेदाराने प्रस्तावित केलेली पावडर वापरल्यामुळे पाच वर्षात 11 कोटी 52 लाख 78 हजार 125 रुपयांचा जास्तीचा बोजा महापालिकेवर पडणार आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यं देशात अशा प्रकारचा प्रकल्प इतर कोणत्याही शहरात झालेला नाही. मात्र, तो पुणेकरांवर (Pune) लादला जातोय का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प परवडणारा नसल्याने निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव घनकचरा विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे.

दरम्यान, कचरा प्रकल्पाच्या परिसरातील दुर्गंधी नष्ट करण्यासाठी पाच वर्षांत 44 कोटी 6 लाख 23 हजार 255 व प्रकल्प उभारणीसाठी 5 कोटी 57 लाख 55 हजार, असे एकूण 49 कोटी 62 लाख 78 हजार 225 रुपये खर्च पालिकेला खर्च करावे लागणार असल्याचे समोर आले.

हडपसर औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या चार कचरा प्रकल्पांची दुर्गंधी येऊ नये, यासाठी तेथील ठेकेदाराकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रकल्पांचे काम पाहणारे अभियंते चुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यावर कारवाई करण्याऐवजी नागरिकांनी तक्रारी केल्या, म्हणून 49 कोटी 63 लाख खर्च केले जात असल्याचा अजब कारभार पालिकेकडून केला जात आहे.

महापालिकेकडून मागील काही वर्षांपासून दुर्गंधी टाळण्यासाठी 'इको चीप' असलेली कल्चर पावडर वापरली जाते. 500 लिटर पाण्यात एक लिटर पावडर टाकावी लागते. त्यानुसार एका दिवसात 30 हजार लिटर पाण्यात 60 लिटर पावडर टाकली जाते. प्रतिकिलो 941 रुपये, असा दर असलेल्या पावडरसाठी दररोज 56 हजार 460 रुपये मोजावे लागतात.

त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी हा खर्च 10 कोटी 30 लाख 39 हजार 500 रुपये इतका असेल. तर दुसरीकडे आता ठेकेदाराने प्रस्तावित केलेल्या कल्चर पावडरमध्ये 'इको चीप' रासायनिक घटक नसल्यामुळे आधी जी पावडर पाचशे लिटर पाण्यात एक किलो टाकली जायची ती आता 180 लिटर पाण्यात एक किलो पावडर अशा प्रमाणात टाकावी लागणार आहे. त्यामुळे या पावडरचा जास्त वापर होणार आहे.

त्यानुसार दररोज 165 किलो पावडर वापरली जाईल. पावडरचा दर 725 रुपये प्रति किलो असून दररोज एक लाख 19 हजार 625 रुपये खर्च होईल. पाच वर्षात 21 कोटी 83 लाख 15 हजार 625 रुपये इतका खर्च होणार आहे.

त्यामुळे पालिका खरेदी करत असलेली पावडर ठेकेदाराच्या दरापेक्षा महाग असली, तरी तिचा वापर कमी होतो. आधीची पावडर वापरल्यास पाच वर्षांत साडे अकरा कोटींची बचत होऊ शकते. त्यामुळे पावडर आणि इतर तांत्रिक बाबींचा खर्च अव्यवहार्य असल्याने निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव घनकचरा विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT