PMC Mayor Manisha Nagpure Sarkarnama
पुणे

Pune Mayor News : मंजुषा नागपुरेंनी हाती घेतला पुण्याचा 'कारभार', जोडीला आठवलेंचा शिलेदार

Pune mayor election news : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदही बिनविरोध निवड झाली आहे.

Rashmi Mane

भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौर पदी, तर भाजप - रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदी सोमवारी विनबिरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नागपुरे यांच्या महापौर पदाचा तर, वाडेकर यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला.

महापालिकेत सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. पीठासन अधिकारी जितेंद्र डूडी यांनी निवडणुकी प्रक्रियेला सुरुवात केली. तत्पूर्वी भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेसचे गटनेते चंदुशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नीलेश निकम यांना केली.

दरम्यान, प्रारंभी महापौर पदासाठी काँग्रेसच्या अश्विनी लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल सावंत व भाजपच्या मंजुषा नागपुरे यांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर पीठासन अधिकारी डूडी यांनी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ दिली. या वेळेत भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. प्रारंभी राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाच्या शीतल सावंत यांनी, त्या पाठोपाठ काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर मंजुषा नागपुरे यांची महापौर पदी बिनविरोध निवड झाल्याचे डूडी यांनी जाहीर केले. त्यानंतर नागपुरे यांची महापौर म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमपहौर पदाच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसकडून साहिल केदारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरट, तर भाजपकडून परशुराम वाडेकर यांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर बहिरट व केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.

त्यामुळे उपमहापौर पदी भाजप रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी डूडी यांनी जाहीर केले. त्यानंतर वाडेकर यांची उपमहापौर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर निवडणुकीचे कामकाज संपन्न झाल्याचे डूडी यांनी जाहीर केले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नागपुरे व वाडेकर यांची सभागृहात उपस्थित राहून अभिनंदन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT