Pune ZP Election Results : अजितदादांचा बालेकिल्ला धोक्यात? पुण्यात राष्ट्रवादीला भाजपकडून 'टफ फाईट'; रेकॉर्ड मोडणार?

Will BJP break NCP record in Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससमोर भाजपचे मोठे आव्हान. ही लढत राष्ट्रवादीचा रेकॉर्ड मोडणार का? सविस्तर वाचा.
Pune ZP Election Results
Pune ZP Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्याच फेरीपासून राजकीय चित्र रंगतदार झालं आहे. अनेक ठिकाणी थेट, तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्यामुळे आघाडी-पिछाडीचं गणित सतत बदलत आहे. पण पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी सुमारे २९९ उमेदवार, तर १३ पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे मतमोजणीदरम्यान चुरशीचे क्षण पाहायला मिळत आहेत.

यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात होणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे जिल्ह्यात भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याच्या चर्चा, पक्षांतर्गत हालचाली आणि नेतृत्वातील बदल या पार्श्वभूमीवर निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला कायम राखणार की भाजप २०१७ चा इतिहास बदलणार, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Pune ZP Election Results
Nashik NMC Politics : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या, नगरसेवक कमलेश बोडकेंवर दुसरा गंभीर गुन्हा दाखल

या ७ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान नोंदवले गेले. वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ७९.३० टक्के मतदान झाले, तर बारामतीत सर्वात कमी ५४.९० टक्के मतदानाची नोंद आहे. नेतृत्वातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी भाजप 'टफ फाईट' देत १८ जागांवर आघाडी घेतली आहे त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढवत आहे.

२०१७ मधील स्थिती

या पार्श्वभूमीवर २०१७ च्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीकडे पाहिलं तर त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवलं होतं. ७५ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. १३ पैकी आठ पंचायत समित्यांवरही राष्ट्रवादीने नियंत्रण मिळवलं होतं. शिवसेना १३ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती आणि तिने तीन पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व मिळवलं होतं. तर भाजपला ७ जागांसह चौथ्या स्थानावर होती.

भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता मिळवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आंबेगाव, शिरूर, मुळशी, हवेली, दौंड, भोर, बारामती आणि इंदापूर या पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. जुन्नर, पुरंदर, खेड येथे शिवसेना, मावळात भाजप आणि वेल्हे येथे काँग्रेसला यश मिळालं होतं.

२०१७ ची आकडेवारी

२०१७ मधील जिल्हा परिषद जागावाटप पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४४, शिवसेनेला १३, भाजपला ७, काँग्रेसला ७, राष्ट्रीय समाज पक्षाला १ आणि इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला ७८, शिवसेनेला ३२, भाजपला १७, काँग्रेसला १६, लोकशाही क्रांती आघाडीला २, राष्ट्रीय समाज पक्षाला १ आणि इतरांना ४ जागा मिळाल्या होत्या.

Pune ZP Election Results
Kolhapur ZP Result : कोल्हापूरात मिळाली 'हाता'ला साथ; काँग्रेसची दमदार सुरुवात;पहिला निकाल बाजुने! जनसुराज्यला धक्का

आता यंदाच्या निवडणुकीत हे सगळं गणित कायम राहणार की पुणे जिल्ह्याच्या राजकारणात नवं समीकरण तयार होणार, याचं स्पष्ट उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे. राष्ट्रवादीचा गड मजबूत राहतो की भाजप २०१७ चा रेकॉर्ड मोडतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com