Pune Graduates Election Harshada Deshmukh-Jadhav Vs Smita Jadhav sarkarnama
पुणे

Pune MLC Election Result : भाजपला मोठा धक्का, पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या जवळ, अवघ्या 725...

Pune Graduates Election Harshada Deshmukh-Jadhav : विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. तर, 17 हजार 299 मतं बाद करण्यात आली होती. मतमोजणीत हर्षदा देशमुख हा विजयाच्या जवळ आहेत.

Roshan More

Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव हे विजयापासून 725 मतांपासून दूर आहेत.

विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. तर, 17 हजार 299 मतं बाद करण्यात आली होती.

पहाटे साडेतीन वाजताच्या मतमोजणी नंतर हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 385 मते मिळाली आहेत. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 725 मतांची आवश्यकता आहे. भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यापासून त्या 11 हजार मताधिक्याने पुढे आहेत.

पुणे पदवीधरसाठी भाजपची प्रतिष्ठापणाला लागली होती. मागील वेळीचे पदवीधरचे आमदार हे अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे पुत्र शरद लाड यांना भाजपमध्ये प्रवेश देत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्यात आला होता. त्यामुळे येथून शरद लाड यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, भाजपने लाड यांना थांबवत स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली होती.

महाविकास आघाडीमध्ये शिक्षकची जाग ही काँग्रेसकडे तर पदवीधऱची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली होती. शरद पवारांनी येथून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली होती. पुणे पदवीधरमधून 62.76 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

सोलापूरमधून सर्वाधिक मतदान

पुणे पदवीधरसाठी सर्वाधिक मतदान सोलापूर जिल्ह्यातून झाले होते. तब्बल 71.43 टक्के मतदान सोलापूरमध्ये नोंदवले गेले.तर, सातारा जिल्ह्यातून 66.94 टक्के मतदान झाले आहे. तर, पुणे जिल्ह्यातून 61.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी मतदान हे सांगली जिल्ह्यातून झाले आहे. अवघे 55.51 टक्के मतदान सांगलीत झाले आहे.पुणे पदवीधरसाठी एकुण दोन लाख 43 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT