Maharashtra MLC Election Results 2026: विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरूवात; पुण्यात आठ मतपेट्या सील नसल्याची हर्षदा देशमुख जाधव यांची तक्रार

MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान झाले. आज निकाल लागणार आहे.
MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026
MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026Sarkarnama

पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबवली, आठ मतपेट्या सील नसल्याची  उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांची तक्रार

Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा

शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार

Pune live: पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरवात

पुणे - पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. पदवीधरांसाठी १०० आणि शिक्षकांसाठी ४२ मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com