Pune Metro sarkarnama
पुणे

Pune Metro : पुणेकरांना केंद्राने दिलं दिवाळी गिफ्ट!; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत आली मोठी अपडेट

Sachin Fulpagare

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. पुणेकरांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांचा बराच वेळ वाया जातो. म्हणूनच पुणेकरांचा वेळ वाचावा, वाहतूक कोंडी दूर व्हावी आणि वेगवान प्रवास व्हावा, यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेबाबत मोठी अपडेट आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत २३.२०३ कि.मी. लांबीचा व ८,३१३ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाचा पुणे मेट्रो मार्ग - ३ माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) तत्वावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला

राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्येच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. या सवलतकार कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता केंद्र शासनामार्फत १,२२५ कोटी रुपये इतका व्यवहार्यता तफावत निधी अपेक्षित आहे. प्रकल्पाचे सवलतकार पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड यांनी १०० टक्के Equity ची गुंतवणूक केली आहे. त्या प्रमाणात बँकेद्वारे कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या १,२२५ कोटींपैकी ४१० कोटी रुपये मिळणेबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता.

केंद्र सरकारकडून मिळाले ४१० कोटी

प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला. आता केंद्र सरकारकडून हा निधी मिळाला आहे.

माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनसाठी ४१० कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. हा निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, असं राहुल महिवाल यांनी म्हटलं आहे. पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT