Nashik - Pune ACB News : लाचखोरीच्या कारवाईत पुण्याला मागे टाकत नाशिक 'एसीबी'ची आघाडी,राज्यात एक नंबर

Anti Corruption Buerau News : दोन्ही एसीबी यूनिटमधील पाचपैकी पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातच सर्वाधिक ट्र्रॅप केले आहेत.
Nashik - Pune ACB News
Nashik - Pune ACB NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : लाचेचे सक्सेसफुल ट्रॅप करण्यात गेल्यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे रेंज यूनिट राज्यात एक नंबरवर होते. पण,यावर्षी पुण्याला मागे टाकत नाशिकने पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. त्यांच्या युनिटच्या प्रमुख तथा एसपी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या महिला अधिकाऱ्याच्या दमदार कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नाशिक (Nashik) एसीबीच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्या रेंजमधील नाशिक, नगर, नंदूरबार, जळगाव,धुळे या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाचखोरी असल्याला दुजोरा मिळाला.दमदार अधिकारी लाभल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे पुणे रेंजमधील पुणे, सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात भ्रष्टाचार(Corruption) बोकाळलेला असला, तरी कारवाईअभावी तो तेवढ्या प्रमाणात पुढे आलेला नाही. दोन्ही एसीबी यूनिटमधील पाचपैकी पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातच सर्वाधिक ट्र्रॅप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik - Pune ACB News
Maratha Reservation Nashik News : बससेवा बंद, शिर्डीच्या भाविकांची संख्या घटली!

गेल्यावर्षी आतापर्यंत 11 महिन्यातच नाही,तर संपूर्ण वर्षभरात एसीबीचे पुणे युनीट राज्यात नंबर वन होते. 2022 ला राज्यात एकूण 583 एसीबीचे ट्र्रॅप झाले. त्यातील 156 पुणे,तर त्याखालोखाल 126 नाशिक एसीबीने (ACB ) केले होते.तिसऱ्या नंबरवर (122) छत्रपती संभाजीनगर होते.यावर्षी 11 महिन्यांतच 995 लाचखोरीचे ट्रॅप सक्सेस झाले आहेत.

त्यातील 139 नाशिक,तर 124 पुण्याने केले आहेत. यावर्षीही छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या नंबरवरच (115) आहे.एसपी घारगे-वालावलकरांच्या नेतृत्वामुळे नाशिक एसीबीने कामगिरीत भरारी घेतली. त्यामुळे त्यांना राज्यात नंबर वनवर जाता आले आहे.

लाचखोरीत राज्यात महसूल विभाग नंबर वन

राज्याच्या 47 विभागात महसूल हा लाचखोरीत यावर्षी नंबर एकवर आहे.म्हणजे यावर्षीच्या 695 ट्रॅपमधील 178 हे महसूल विभागात झाले असून त्यानंतर पोलिस खाते दोन नंबरवर (126) आहे. गेल्यावर्षी सुद्धा `महसूल`च या `कामगिरी`त अव्वल (175),तर पोलिस हे `उपविजेते`(161) होते.

यावर्षी नगरपालिका, बेस्ट,उच्च तंत्र शिक्षण विभाग,कौशल्य विकास विभाग, क्रीडा विभाग, बंदर, कारागृह,रेशीम उद्योग आणि महात्मा फुले मागासवर्गीय या दहा विभागात लाचखोरीचा एकही ट्रॅप झालेला नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Nashik - Pune ACB News
Maratha Reservation: नगरमध्ये दहा तरुणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com