Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Hit and Run Case : 'हिट अँड रन' अपघाताची माहिती पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलीच नसल्याचे उघड

Pune Crime News : रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. मात्र या अपघाताची माहिती या भागातील पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वरिष्ठांना कळविली नसल्याचे समोर आले आहे.

Chaitanya Machale

Pune News : कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणात आता एक नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. मात्र या अपघाताची माहिती या भागातील पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांनी आपल्या वरिष्ठांना कळविली नसल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या पोर्श गाडीवर हल्ला करत गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाहेर काढले. त्याला चांगला चोप दिला. गाडीचे नुकसान केले. (Pune Hit and Run Case News in Marathi)

या घटनेनंतर तेथे पोलिस आले. त्यांनी या अल्पवयीन मुलासह त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) आणले. कल्याणीनगर भागात झालेल्या या अपघाताची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला दिली नसल्याचे समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षकाने माहिती दडवून ठेवली असल्याचे समोर आले आहे. याची चौकशी केली जात असून या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर घटनास्थळी आलेले पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकानी पुणे पोलीस यांच्या पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहितीच कळवली नाही. या बरोबरच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त, स्थानिक परिमंडळाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देखील याची कोणतीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली नव्हती.

आता ही नवी माहिती उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती दडवून ठेवण्यामागे या निरीक्षक आणि सहायक निरीक्षकाचा काय हेतू होता हा प्रश्न आहे. याप्रकरणी आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

(Edited by : Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT