Medha Kulkarni On Porsche Accident : 'ब्लॅक पबच्या मालकाचे नाव का वगळले?' मेधा कुलकर्णींनी आयुक्तांना सुनावले खडेबोल

Pune Porsche Accident : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Medha Kulkarni On Porsche Accident
Medha Kulkarni On Porsche AccidentSarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Accident Case  : पुण्यातील कल्याणीनगर भागातील ड्रंक अँड ड्राईव्ह अपघातामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने पोर्श कार (Porsche) भरधाव वेगाने चालवीत हा अपघात केला. त्यानंतर अवघ्या 15 तासात या अल्पवयीन मुलाला जामीन देखील मंजूर झाल्याने पोलीस खात्यावर टीकेची झोड उठली होती.

हा अल्पवयीन आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्यासाठी पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Raindra Dhangekar) यांनी हे प्रकरण लावून धरले असून यामध्ये पोलिस अधिकारी विकले गेल्याचा आरोप केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांची बदली करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

Medha Kulkarni On Porsche Accident
Amitesh Kumar Porsche Car Accident : आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न, पोलिस आयुक्तांनी दिला दुजोरा

या प्रकरणात आता भाजपच्या (BJP) राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी देखील लक्ष घातले आहे. शहरातील अनेक बेकायदा गोष्टींकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहराची सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. पोलिस कारभाराबाबत पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी आहे, असे खडेबोल खासदार कुलकर्णी यांनी पोलिसांना सुनावले. शहरातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची दखल घेऊन त्वरीत सर्वत्र कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली.

खासदार कुलकर्णी यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताची माहिती त्यांनी घेतली. ब्लॅक पबच्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळण्यात आले? असा प्रश्नही त्यांनी या चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. या केसमधील सर्वच्या सर्व गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.

शहरात अवैध आणि नियमबाह्य गोष्टींना उधाण आले आहे. यात प्रामुख्याने अनधिकृत पब, बार, रूफ टॉप हॉटेल्सची अवैध बांधकामे, रात्री उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्स, स्नॅक सेंटर्स, खाद्यपदार्थांचे अनधिकृत स्टॉल्स याचा समावेश आहे. वेदांत अगरवाल संबंधित घटना हे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा घटना पुण्यात वारंवार घडत आहेत. अवैध, अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यात पोलीस कुचकामी ठरले आहेत, असे कुलकर्णी म्हणाल्या. शहरात एकूण अधिकृत पब, बार किती? अनधिकृत आणि अनियमित किती? याची माहिती मिळावी आणि कारवाईचे वेळापत्रक द्यावे, असे खासदार कुलकर्णी यांनी पोलिस आयुक्तांना सुनावले आहे. Police commissioner

Medha Kulkarni On Porsche Accident
Porsche Car Accident : कलेक्टर सुहास दिवसेंचा पारा चढला अन् एका झटक्यात 32 बारच्या परवान्यांवर मारली ' लाल फुली'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com