Pune Hit And Run Case vedant Agarwal Sarkarnama
पुणे

Pune Hit and Run Case : आरोपीच्या नातेवाईकांची पत्रकारांना अरेरावी अन् शिवीगाळ, पुण्यात वातावरण तापलं

Pune Car Accident Case : पुण्यामध्ये अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यासोबतच नातेवाईकांची पत्रकारांना अरेरावी अन् शिवीगाळ केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे काळी काळ वातावरण चांगलेच तापले होते.

Sachin Waghmare

Pune News : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री बिल्डर असलेल्या विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये बाइकवर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात बालसुधार गृहात असलेल्या अल्पवयीन मुलावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

पुणे कोर्टात गुरुवारी कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला (Vishal Agraval) हजर करण्यात आले. मात्र त्याआधीच कोर्टाच्या परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे पुण्यामध्ये अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यासोबतच नातेवाईकांची पत्रकारांना अरेरावी अन् शिवीगाळ केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे काळी काळ वातावरण चांगलेच तापले होते. (Pune Hit and Run Case News )

दरम्यान, कोर्टाच्या परिसरात घडलेल्या या सर्व प्रकारानंतर पुण्यातील काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणांनंतर अग्रवाल कुटुंबाचे धाडस वाढले आहे. पुण्यात पत्रकाराला मारहाण होतीय हा प्रकार दुर्दैवी आहे. आयुक्तांनी कारवाई करावी, अन्यथा शुक्रवारी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिला आहे. त्यामुळे आता काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला गुरुवारी पुणे कोर्टात दाखल करण्यात आले होते. कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवालवर शाईफेक करता आली नाही. वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचलले असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांमुळे बचावला; अंगावर शाई पडली

पोलिसांनी याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या हल्ल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या सगळ्यांचे हात काळ्या शाईने रंगलेले दिसत होते. आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर शाई पडली. पण नंतर तो पोलिसांमुळे बचावला, असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT