Pune Porsche Crash Shivani Agarwal Sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case Update : कल्याणीनगर अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांचे ब्लड सॅम्पल घेणार ?

Pune Porsche Crash : ससूनमधील चौकशी समितीच्या चौकशीत या अल्पवयीन मुलाचे जे ब्लड सॅम्पल दाखविण्यात आले होते, ते एका महिलेचे असल्याचे पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ही महिला या मुलाची आई शिवानी अगरवाल होत्या का ? याचा तपास केला जात आहे..

Chaitanya Machale

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवीन घडामोड घडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल फरार असून तिचा शोध पोलिसांकडून घेतला आहे. या अपघात प्रकरणात तपासासाठी या मुलाची आई शिवानी यांचे ब्लड सॅम्पल घेतले जाणार असून यामध्ये काही बनवाबनवी झाल्याचे उघड झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक होण्याची शक्यता आहे.

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवित एका दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील अनेक महत्वाचे घटक समोर आले होते.

हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवित असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी (Police) त्याचे वडील विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर या मुलाने केलेला गुन्हा आपल्या नावावर घेण्यासाठी विशाल अगरवाल आणि या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल याने ड्रायव्हरवर दबाव टाकत त्याला खोलीत डांबून ठेवल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आजोबाला देखील अटक केली आहे. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात बदलण्यात आले. ससूनमधील डॉक्टरांनी हे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रूपये दिल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांसह एका शिपायाला अटक केली आहे. ससूनमधील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने (State Goverment) त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

या चौकशी समितीच्या चौकशीत या अल्पवयीन मुलाचे जे ब्लड सॅम्पल दाखविण्यात आले होते, ते एका महिलेचे असल्याचे पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ही महिला या मुलाची आई शिवानी अगरवाल होत्या का ? याचा तपास केला जात आहे. यासाठी त्यांच्या ब्लडचे सॅम्पल घेतले जाणार आहे. त्यानंतर ही महिला नक्की कोण, हे स्पष्ट होणार आहे. यामध्ये शिवानी अगरवाल दोषी आढळल्यास त्यांना देखील तपासासाठी अटक करून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

या अपघात प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या शिवानी अगरवाल गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकाविल्याप्रकरणी पोलिसांकडून शिवानी यांची चौकशी होणार आहे. पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता झाल्या आहेत. तसेच शिवानी यांचा फोन देखील बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या नक्की कोठे गायब झाल्या असा प्रश्न विचारला जात आहे.

मुलााला भेटण्यासाठी 3 जूनला आई शिवानी अगरवाल येण्याची शक्यता

दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून दोन अभियंत्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाल न्याय मंडळाने या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात केली आहे. याची मुदत 4 जूनला संपणार आहे. त्यामुळे पुढील सोपस्कर पूर्ण करण्यासाठी 3 जूनला या आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल बालसुधारगृहात येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT