Pune Hit And Run Case : 'बाळा'च्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी बाहेरील व्यक्ती 'ससून'मध्ये?

Pune Accident Porsche : ससून रुग्णालयातील संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कारचालकाचे ब्लड सॅम्पल घेतले होते. मात्र ऐनवेळी बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने ब्लड सॅम्पल बदलण्यास भाग पाडले.
dr shrihari holnor  Vishal Agrwal  Dr Ajay Taware
dr shrihari holnor Vishal Agrwal Dr Ajay Taware sarlkarnama
Published on
Updated on

सागर आव्हाड

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याने मोठी खळबळ झाली. दोन डाॅक्टारांसह एक कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. आता याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

अपघात घडल्यानंतर ब्लड सॅम्पल घेण्यासाठी अल्पवयीन कारचालकाला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे त्याचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र ऐनवेळी त्या ठिकाणी बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनसार, ससून रुग्णालयातील संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कारचालकाचे ब्लड सॅम्पल घेतले होते. मात्र ऐनवेळी बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने डॉक्टरांवर दबाव टाकत ब्लड सॅम्पल बदलण्यास भाग पाडले आणि स्व:त सोबत आणलेले ब्लड सॅम्पल त्या ठिकाणी ठेवले.

ससून रुग्णालयात आलेली ती व्यक्ती कोण? कुणाच्या सांगण्यावरून तो रुग्णालयात आला होता? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

dr shrihari holnor  Vishal Agrwal  Dr Ajay Taware
Pune Porsche Accident : अजय तावरेचा विशाल अगरवालला सल्ला; रक्त बदलले, तर...

डॉ.अजय तावरे Dr Ajay Taware यानेच बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालला अल्पवयीन मुलाचा रक्ताचा नमुना बदलण्याचा सल्ला दिला होता, हे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, डॉ. तावरे हा आणखी कोणाच्या संपर्कात होता?

त्याला आणखी कोणी संपर्क साधला, याचे तांत्रिक पद्धतीनं विश्लेषण सुरू असल्याचे पोलिसांनी Police सांगितले आहे. दरम्यान, या तपासात ब्लॅड सॅम्पल बदलण्यासाठी ससूनमध्ये आलेल्या 'त्या' व्यक्तीची ओळख देखील उघड होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डाॅक्टरला 14 वेळा फोन

ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे याचे अल्पवयीन आरोपीचे सॅम्पल संकलना दरम्यान सुमारे दोन तासांत 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलणे झाले. पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. डाॅ. तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर यांना शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. आरोपी डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड स्मॅपल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यातही फेकून दिल्याचे समोर आले होते.

(Edited By Roshan More)

dr shrihari holnor  Vishal Agrwal  Dr Ajay Taware
Vasant More News: धंगेकरांची प्रसिद्धी वसंत तात्यांच्या डोळ्यात खुपली? पत्रकारांना म्हणाले, "तुम्हाला फक्त रवींद्र..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com